नोकरी सोडून सुरू करा हा बिझनेस, ५००० रूपये गुंतवा आणि करा लाखोंची कमाई

काम-धंदा
Updated Mar 09, 2021 | 13:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतात मोठ्या संख्येने लोक चहाचे शौकीन आहेत. रेल्वे स्टेशन्स, बस डेपो आणि विमानतळांवर कुल्हडमधील चहाच्या मागणीला मोठी वाढ आहेत. अशातच तुम्ही कुल्हड बनवणे तसेच विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. जाणून घ्या क

money
नोकरी सोडून सुरू करा हा बिझनेस, ५००० रूपये गुंतवा आणि... 

थोडं पण कामाचं

  • सरकार सध्या कुल्हडच्या मागणीला वाढ देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे
  • तुम्ही खूप कमी किंमतीत हा बिझनेस सुरू करू शकता
  • चहासाठी वापरले जाणारे कुल्हड स्वस्त असण्यासोबतच पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षितही आहेत

मुंबई: तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे का? तुम्हाला एक्स्ट्रा कमाई करण्याचा प्लान आहे का? आम्ही तुम्हाला देत आहोत एक अशी बिझनेस आयडिया जिच्या मदतीने तुम्ही दर महिन्याला बंपर पैसे कमवू शकता. भारतात मोठ्या प्रमाणात चहा प्यायला जातो. भारतातील लोकांसाठी चहा म्हणजे जणू काही अमृतच. रेल्वे स्थानके, बस डेपो आणि विमानतळांवर कुल्हडमधील चहाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अशातच तुम्ही हे मातीचे कुल्हड बनवण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय करू शकता. 

सरकार देत आहे प्रोत्साहन

सरकार सध्या कुल्हडच्या मागणीला वाढ देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. काही दिवसांआधी रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कुल्हडच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी प्लास्टिक आणि कागदाच्या कपांना रोखण्याची शिफारस केली होती. मोदी सरकारने कुल्हड बनवण्याच्या व्यवसायाल प्रोत्साहन देण्यासाठी कुंभार सशक्तीकरण योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार देशभरातील कुंभारांना इलेक्ट्रिक चाक देत आहे. या चाकाच्या मदतीने कुंभार कुल्हडसह मातीची भांडी बनवू शकतात त्यानंतर सरकार हे कुल्हड चांगल्या किंमतीववर खरेदी करणार. 

५ हजार गुंतवून सुरू करू शकता बिझनेस

सध्याचा काळ पाहता तुम्ही खूप कमी किंमतीत हा बिझनेस सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला थोडीशी जागा आणि त्यासोबतच ५ हजार रूपयांची गरज आहे. खादी ग्रामोद्योगचे चेअरमन विनय कुमार सक्सेना यांनी ही माहिती दिली आहे. यावर्षी सरकारने २५ हजार इलेक्ट्रिक चाक वितरित केले. 

किती रूपयांत विकू शकता कुल्हड 

चहासाठी वापरले जाणारे कुल्हड स्वस्त असण्यासोबतच पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षितही आहेत. सध्याच्या दराबाबत बोलायचे झाल्यास चहाच्या कुल्हडचा भाव ५० रूपये शेकडा आहे. याच प्रकारेच लस्सीच्या कुल्हडची किंमत १५० रूपये शेकडा, दुधाच्या कुल्हडची किंमत १५० रूपये शेकडा आहे. मागणी वाढल्यास यास चांगले दर मिळण्याची शक्यता आहे.

चांगली बचत

सध्या शहरांमध्ये कुल्हडमधील चहाची किंमत १५ ते २० रूपये इतकी आहे. जर बिझनेस योग्य पद्धतीने सुरू राहिला तर दिवसाला एक हजार रूपये बचत केली जाऊ शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी