Indian Railways transport | नवी दिल्ली : अनेकवेळा लोकांना वेगवेगळ्या कारणांमुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हावे लागते. अशावेळी आपले वाहन म्हणजे स्कूटर किंवा बाईकदेखील सोबत न्यावी लागते. यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट करणे हा एक सुरक्षित आणि स्वस्त पर्याय ठरू शकतो. रेल्वे कुरियरच्या मदतीने सहजरित्या तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात दुचाकी पाठवू शकता. रेल्वेद्वारे बाइक किंवा स्कूटर पाठवण्याची पद्धत आणि नियम जाणून घेऊया. (Indian Railway : You can transport your bike or scooter by train, know the rules)
भारतीय रेल्वेद्वारे कोणत्याही वस्तूची वाहतूक करण्याच्या दोन पद्धती आहेत. लगेज स्वरुपात किंवा पार्सल स्वरुपात. लगेज याचा अर्थ असतो की सामान तुम्ही प्रवासादरम्यान आपल्या सोबतच घेऊन जात आहात. तर पार्सलचा अर्थ असतो की तुम्ही सामान आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी पाठवत आहात मात्र त्यासोबत तुम्ही प्रवास करत नाहीत.
बाइक पार्सल करण्यासाठी तुम्हाला आपल्या जवळच्या रेल्वे स्टेशनवर जावे लागेल. तिथे पार्सलसंबंधीची माहिती पार्सल काउंटर मिळेल. त्यानुसार कागदपत्रे तयार करावे लागतील. कागदपत्रांची ओरिजिनल कॉपी आणि फोटोकॉपी दोन्ही सोबत ठेवा. व्हेरिफिकेशनच्या वेळेस ओरिजिनल कॉपीची गरज पडू शकते. यानंतर पार्सल करण्याआधी तुमच्या बाइकचा टॅंक तपासला जाईल.
रेल्वेद्वारे सामान पाठवण्यासाठी वजन आणि अंतर यानुसार भाडे आकारले जाते. बाइक ट्रान्सपोर्ट करण्यासाठी रेल्वे हे स्वस्त आणि वेगवान माध्यम आहे. लगेज साठीचे शुल्क पार्सलच्या तुलनेत अधिक असते. ५०० किमी अंतरापर्यत बाइक पाठवण्यासाठी सरासरी भाडे १,२०० रुपये असते. अर्थात यात थोडा बदल असू शकतो. याशिवाय बाइकच्या पॅकिंगवर जवळपास ३०० ते ५०० रुपयांचा खर्च येऊ शकतो.
रेल्वे विभागानुसार, जर तुमच्याकडे कन्फर्म रेल्वे तिकीट असेल तर तुम्हाला रिझर्व्हेशन केलेलं तिकीट रद्द करण्याचं असेल तर जर चार तासपेक्षा कमी वेळ तुमच्याकडे राहिला असेल तर तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही. चार तासपेक्षा अधिकचा वेळ तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 50 टक्क्यापर्यंत रिफंड मिळू शकतो. म्हणजेच तिकीट रद्द करायचा असेल तर तुम्हाला वेळ डोक्यात ठेवावी लागेल. जर तिकीट कन्फर्म आहे आणि रेल्वे सुटण्याच्या 12 तास आधी आणि 48 तास आधी तिकीट रद्द केलं तर रेल्वे प्रति प्रवाशांच्या तिकीटाच्या एकूण मुल्यातून 25 टक्के किंवा तिकीट रद्द केल्यास प्रति प्रवाशी 60 रुपयांपेक्षा जास्त शुल्क भरावे लागेल.