EPFO | खूशखबर! वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पीएफमधून १ लाख रुपये काढण्यास परवानगी, अशी पूर्ण करा प्रक्रिया

EPF Withdrawal : काही कारणास्तव आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक अडचणीमुळे तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन म्हणजे ईपीएफओ (EPFO)यासाठी परवानगी देते. भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढणे ही आता अवघड प्रक्रिया राहिलेली नाही. ईपीएफओच्या नवीन नियमानुसार, मेडिकल अॅडव्हान्स क्लेम अंतर्गत तुम्ही भविष्य निर्वाह निधीतून १ लाख रुपये काढू शकता.

PF withdrawal for medical emergency
वैद्यकीय आपत्कालीन खर्चासाठी पीएफमधून मिळतात पैसे 
थोडं पण कामाचं
 • पीएफमधून आपत्कालीन पैसे काढता येणार
 • वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी ईपीएफओने दिली १ लाख रुपये काढण्याची परवानगी
 • कोरोनासारख्या संकटकाळात पीएफ खातेधारकांना घेता येणार या सुविधेचा लाभ

PF Withdrawal : नवी दिल्ली: प्राव्हिडंट फंडाची (PF)रक्कम ही निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीची तजवीज असते. मात्र काही कारणास्तव आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक अडचणीमुळे तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन म्हणजे ईपीएफओ (EPFO)यासाठी परवानगी देते. भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढणे ही आता अवघड प्रक्रिया राहिलेली नाही. ईपीएफओच्या नवीन नियमानुसार, मेडिकल अॅडव्हान्स क्लेम अंतर्गत तुम्ही भविष्य निर्वाह निधीतून १ लाख रुपये काढू शकता. सदस्य कोणत्याही कागदपत्राशिवाय रक्कम काढू शकतात. (You can withdraw Rs 1 lakh from PF, as per EPFO rule)

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत, ही तरतूद EPFO ​​अंतर्गत लाखो खातेदारांसाठी फायदेशीर ठरू शकते. ताज्या मेमोरँडमनुसार, जीवघेणा आजार झाल्यास, व्यक्ती रुग्णालयात दाखल करण्यासाठी १ लाख रुपये काढू शकते. पण त्यासाठी काही अटी आहेत.

पीएफमधून पैसे काढण्यासाठी अटी आणि प्रक्रिया -

 1. व्यक्तीला सरकारी हॉस्पिटल / CGHS पॅनेल हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक आहे.
 2. खाजगी रुग्णालयाच्या बाबतीत, पैसे काढण्याची परवानगी देण्यापूर्वी तपास केला जाईल.
 3. कामाच्या दिवशी अर्ज दाखल केल्यास, दुसऱ्याच दिवशी पैसे हस्तांतरित केले जातील.
 4. पैसे कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक खात्यात किंवा रुग्णालयाच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकतात.
 5. पीएफ खात्यातून १ लाख रुपये काढण्याची प्रक्रिया पूर्ण करा
 6. अधिकृत वेबसाइट www.epfindia.gov.in वर जा
 7. 'ऑनलाइन सेवा' वर क्लिक करा
 8. फॉर्म ३१, १९, १० सी आणि १० डी भरा
 9. आता, पडताळणी करण्यासाठी तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक प्रविष्ट करा
 10. 'ऑनलाइन दाव्यासाठी पुढे जा' वर क्लिक करा
 11. ड्रॉप-डाउन मेनूमधून फॉर्म ३१ निवडा
 12. पैसे काढण्याचे कारण एंटर करा
 13. रक्कम प्रविष्ट करा आणि रुग्णालयाच्या बिलाची एक प्रत अपलोड करा
 14. तुमचा पत्ता प्रविष्ट करा आणि 'सबमिट' वर क्लिक करा

पीएफचे व्याज खात्यात झाले जमा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ईपीएफओने (EPFO)२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचे पीफ खात्यांचे व्याज जमा (Interest on PF) केले आहे. २४.०७ कोटी पीएफ खातेधारकांच्या (PF Account holders) खात्यात सरकारने ८.५० टक्के व्याजदराने व्याज जमा केले आहे. ईपीएफओकडून ट्विट करत यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचे पीएफचे व्याज सरकारने जमा केले आहे. तुमच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले की नाही ते चेक करू शकता.

 1. वेबसाइटद्वारे तुम्ही पीएफ चेक करू शकता. ईपीएफओच्या Epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही लॉगिन करा. यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावे लागेल. यानंतर passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर तुम्ही याल. तिथे तुमचा युजर नेम, युएएन क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा. ई-पासबुक गेल्यावर मेंबर आयडीवर क्लिक करून तुम्ही तुमची माहिती चेक करू शकता.
 2. एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही पीएफ बॅलन्स तपासू शकता. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून ७७३८२९९८९९ या क्रमांकावर मेसेज करा. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्ही या क्रमांकावर हा मेसेज पाठवा. यानंतर तुम्हाला इंग्रजी भाषेत माहिती मिळेल. जर तुम्हाला इतर भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी त्या भाषेचा उल्लेख करा. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तामिळ, मल्यायळम आणि बंगाली या भाषेत ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी पीएफ खात्यामध्ये तुमचा मोबाइल नंबर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी