Task to be completed before 31 March 2022 : नवी दिल्ली : मार्च महिनाअखेर आर्थिक वर्ष सरणार असते त्यामुळे या महिन्यात आर्थिक कामे उरकण्याची अत्यंत लगबग सुरू असते. अनेक आर्थिक कामांची अंतिम मुदत ही 31 मार्चपर्यत असते. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची अनेक कामे मार्च महिन्यात तुमच्यासमोर असतात. मात्र काही कामांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. अशा कामांकडे एक नजर टाकूया. तुमचे नुकसान होऊ द्यायचे नसेल तर ही महत्त्वाची कामे तुम्ही 31 मार्चच्या आधी पूर्ण केलीच पाहिजेत. पॅन-आधार लिंकिंग (PAN-Aadhar Linking), बँक खाते केवायसी अपडेट (KYC), पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) यांसारख्या अल्पबचत योजनांमध्ये आवश्यक किमान गुंतवणूक करणे ही ती महत्त्वाची कामे आहेत. 31 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ही कामे पूर्ण केली नाहीत तर तुमचे नुकसान होऊ शकते. (You should complete these 3 tasks by 31st March 2022)
अधिक वाचा : PNB Update | पंजाब नॅशनल बॅंकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे! 4 एप्रिलपासून बदलणार हा महत्त्वाचा नियम...
कोणत्याही व्यक्तीने 31 मार्च 2022 ला किंवा त्यापूर्वी पूर्ण केलीच पाहिजेत अशी कामे जाणून घ्या.
अधिक वाचा : Maharashtra CNG | महाराष्ट्रात सीएनजीवरील व्हॅटमध्ये कपात...1 एप्रिलपासून इंधन होणार स्वस्त