या सरकारी योजनेत तुमच्या मुलीला मिळणार 42.48 लाख रूपये, दरमहा जमा करा एवढी रक्कम

काम-धंदा
Updated Apr 10, 2023 | 05:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांसाठीचे व्याजदर जाहीर केले. यात, सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरातही सरकारने वाढ केली आहे.

Your daughter will get Rs 42.48 lakh in sukanya samriddhi yojana
या सरकारी योजनेत तुमच्या मुलीला मिळणार 42.48 लाख रूपये  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरातही सरकारने वाढ केली
  • मोदी सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली
  • सुकन्या योजनेचे व्याज दर तिमाही आधारावर बदलतात.

Sukanya Samriddhi Yojana: केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांसाठीचे व्याजदर जाहीर केले. यात, सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरातही सरकारने वाढ केली आहे. या योजनेचे व्याज पूर्वीच्या  7.60 टक्क्यांवरून 8 टक्के करण्यात आला आहे. (Your daughter will get Rs 42.48 lakh in sukanya samriddhi yojana)

केंद्रातील मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 10 वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी पालक सुकन्या समृद्धी बचत खाते उघडू शकता. या खात्यात मुलीच्या भविष्यासाठी मोठी रक्कम जमा होऊ शकते. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला या खात्याच्या माध्यमातून मुलीसाठी 40 लाख रुपयांहून अधिकची व्यवस्था कशी करू शकतो, याबद्दल सांगणार आहोत. 

अधिक वाचा: पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये  मिळणार आता दुहेरी व्याज! फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जबरदस्त फायदे मिळवा

समजा तुमची प्रतिमहिन्याची गुंतवणूक 12,500 रुपये आहे. या हिशोबाने तुमची दरवर्षीची गुंतवणूक 1,50,000 लाख रुपये होईल. सुकन्या समृद्धी खात्याची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे. जर तुम्ही 15 वर्षांसाठी प्रति वर्ष 1,50,000 लाख रुपये गुंतवले तर तुमची 22.50 लाख रुपये एकूण गुंतवणूक होईल. या गुंतवणुकीवर 8 टक्के दराने एकूण 19.98 लाख रुपयांचे व्याज मिळेल. अशा प्रकारे, मॅच्युरिटीपर्यंत तुमच्या खात्यात एकूण 42.48 लाख रुपये रक्कम जमा होईल. याचा अर्थ 15 वर्षांनंतर तुम्हाला 42.48 लाख रुपये मिळतील. या पैशांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलीचे शिक्षण आणि लग्न करुन देऊ शकता.

अधिक वाचा: Sukanya Samriddhi Yojana: आता आनंदाने म्हणा मुलगी झाली हो! 21 वर्षी तुमची कन्या होणार 70 लाख रुपयांची मालकीण; जाणून घ्या काय आहे योजना


सुकन्या अंतर्गत, विशिष्ट परिस्थितीत मॅच्युरिटी रकमेच्या 50% टक्क्यांपर्यंत रक्कम काढली जाऊ शकते. त्याचबरोबर मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही पैसे काढण्याची सुविधा आहे. येथे एक गोष्ट मात्र आवश्य लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे सुकन्या योजनेचे व्याज दर तिमाही आधारावर बदलतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी