Homebuyers Alert | तुमच्या होम लोनच्या ईएमआयमध्ये होणार वाढ, द्यावे लागणार जास्त व्याज...पाहा का?

Home loan EMI : तुम्ही गृहकर्जाद्वारे (Home Loan)घर विकत घेतले आहे का? जर याचे उत्तर 'हो'असेल तर तुम्हाला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तुमच्या खिशावरील ताण वाढू शकतो. कारण तुमच्या गृहकर्जावरील व्याजदरात (Home Loan interest rate)वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तुमचा गृहकर्जावरील ईएमआयदेखील वाढू शकतो. गृहकर्जावरील व्याजदरात वाढ होण्यामागील कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) जूनमध्ये रेपो दरात किमान 25 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याची शक्यता आहे.

Home Loan Interest rate
गृहकर्जावरील व्याजदर 
थोडं पण कामाचं
  • रेपो रेट हा तो व्याज दर आहे ज्यावर आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) जूनमध्ये रेपो दरात किमान 25 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याची शक्यता
  • व्याजदर वाढवण्यासाठी बॅंकांवर दबाव येणार

Home loan to get costlier : नवी दिल्ली : तुम्ही गृहकर्जाद्वारे (Home Loan)घर विकत घेतले आहे का? जर याचे उत्तर 'हो'असेल तर तुम्हाला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तुमच्या खिशावरील ताण वाढू शकतो. कारण तुमच्या गृहकर्जावरील व्याजदरात (Home Loan interest rate)वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तुमचा गृहकर्जावरील ईएमआयदेखील वाढू शकतो. गृहकर्जावरील व्याजदरात वाढ होण्यामागील कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) जूनमध्ये रेपो दरात किमान 25 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एका अहवालात असे म्हटले आहे. (Your home loan interest may increase, check the reason)

अधिक वाचा : Gold Price Today | लग्नसराईत सोन्याच्या भावात येणार मोठी तेजी, लवकर खरेदी करा...पाहा ताजा भाव

तुमच्या गृहकर्जावरील व्याजदर का वाढणार?

SBI Ecowrap च्या अहवालात (एप्रिल 13) असे म्हटले आहे की चक्रात 75 बेस पॉइंट्सच्या (interest rate hardening) एकत्रित दर वाढीसह जून आणि ऑगस्टमध्ये प्रत्येकी 25 बेसिस पॉइंट (bps) दर वाढीची अपेक्षा आहे. रेपो दर हा व्याज दर आहे ज्यावर रिझर्व्ह बॅंक व्यावसायिक बँकांना निधी देते. रेपो दरात वाढ केल्यास गृहकर्ज, कार लोन, वैयक्तिक कर्ज आणि इतर प्रकारच्या अॅडव्हान्सवरील व्याजदर वाढवण्यासाठी बॅंकांवर दबाव येणार आहे. त्यामुळे, जर तुम्ही फ्लोटिंग व्याजदरावर गृहकर्ज घेतले असेल, तर तुम्हाला तुमच्या गृहकर्जासाठी जास्त व्याजदर भरावा लागेल.

अधिक वाचा : PPF investment limit : पीपीएफमधील करमुक्त गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा केंद्राचा विचार

आरबीआयने काय ठरवले

आरबीआयने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो दर ४ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. चलनविषयक पॅनेलने वाढीला पाठिंबा देताना, महागाई पुढील लक्ष्याच्या आत राहण्यासाठी व्याजदर अनुकूल ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

महागाईचा तडका

मात्र तुम्हाला माहित आहे की वाढत्या महागाईमुळे, रेपो दर कायम ठेवणे आरबीआयसाठी कठीण जात आहे. उदाहरणार्थ, खाद्यपदार्थांच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाल्यामुळे फेब्रुवारी 2022 मध्ये 6.07 टक्के असलेला किरकोळ महागाईचा दर  मार्च 2022 मध्ये 6.95 टक्क्यांपर्यंत वाढला. किरकोळ चलनवाढ ग्राहक किंमत-आधारित निर्देशांक (CPI) द्वारे मोजली जाते.रशिया-युक्रेन संघर्षामुळे महागाईच्या पातळीत अभूतपूर्व वाढ झाली आहे. गहू, प्रथिनयुक्त पदार्थ (विशेषतः चिकन), दूध, शुद्ध तेल, बटाटे, मिरची, रॉकेल, सरपण, सोने आणि एलपीजी यासारख्या खाद्यपदार्थांच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली आहे.

अधिक वाचा : PM Kisan Samman Yojana: मोठी बातमी! या लोकांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाही

ग्राहकांना बिल्डरविरोधात तक्रार करता येणार

घर विकत घेणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अलीकडेच मोठा दिलासा दिला आहे. नव्या व्यवस्थेनुसार असे बिल्डर ज्यांनी रेरा कायदा (RERA)लागू होण्याआधी आपल्या प्रकल्पाचे कम्प्लीशन सर्टिफिकेट (CC-Completion Certificate) घेतलेले नाही, ते देखील रेराच्या अखत्यारित येणार आहेत. मग त्यांनी रेराअंतर्गत नोंदणी (RERA Registration) केलेली असो किंवा नसो. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा फायदा घर विकत घेणाऱ्यांना होणार आहे. यासाठी ग्राहकांना एवढेच करावे लागले की सोसायटीच्या लोकांनी एकत्र येऊन रेरामध्ये तक्रार करावी. बिल्डरला सर्व रेंगाळलेली आणि अर्धवट कामे पूर्ण करावी लागतील. या प्रकरणात बिल्डरला कोणत्याही सबबी देता येणार नाहीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी