धक्कादायक: कोरोना व्हायरसच्या नावाखाली तुमच्या बँक खात्यातून पैसे होऊ शकतात गायब

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Mar 15, 2020 | 12:45 IST

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभर वेगाने पसरत आहे आणि लोक याबद्दल फार घाबरले आहेत. दरम्यान, हॅकर्स या विषाणूच्या नावाखाली संवेदनशील माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत.

your money may disappear from bank account in the name of coronavirus
धक्कादायक: कोरोना व्हायरसच्या नावाखाली तुमच्या बँक खात्यातून पैसे होऊ शकतात गायब  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: कोरोना व्हायरस हा एक असा रोग आहे की, ज्याने सध्या संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आहे. आतपर्यंत जगभरात १ लाख २० हजाराहून अधिक लोकांना या आजाराची लागण झाली आहे. तर यापैकी ५४०० जणांनी या रोगामुळे आपले प्राणही गमावले आहेत. दरम्यान, लोक या आजारामुळे प्रचंड घाबरले आहेत आणि या आजाराबद्दल इंटरनेटवर अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात कोरोना विषाणूची लक्षणे, प्रतिबंध करण्याच्या पद्धती आणि कोरोना व्हायरल कोठे पसरत आहे याची सर्व माहिती समाविष्ट आहे. परंतु कोरोनाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी इंटरनेटवर कोठेही क्लिक करणं आपल्यासाठी खूप महागडं ठरू शकतं.

अहवालानुसार, कोरोना व्हायरसच्या नावाखाली तुमची संवेदनशील माहिती चोरून हॅकर्स तुमचे मोठे नुकसान करु शकतात. यात आपले बँक खाते, कार्ड नंबर आणि पासवर्ड संबंधित अनेक गोष्टींचा समावेश आहे. आपल्या कम्प्युटर किंवा फोनमध्ये जतन केलेल्या डेटा चोरी करुन त्याच्या मदतीने आपल्या बँक खात्यात जमा असलेल्या पैशांवर सहजपणे डल्ला मारला जाऊ शकतो 

लाइव्ह मॅप ट्रॅकिंगचा वापर करतात हॅकर्स: बर्‍याच संस्थांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं की, वेबसाइट्स किंवा अ‍ॅप्ससारखे तयार केले आहेत जिथे कोरोना विषाणूचे परिणाम जाणून घेतले जाऊ शकतात. हॅकर्स याचा फायदा घेण्याच्या विचारात आहेत. एका अहवालानुसार लाइव्ह ट्रॅकिंग मॅपच्या सहाय्याने ते लोकांच्या कम्प्युटर व फोनवर मालवेयर पाठवतात. ज्यानंतर फोनच्या ब्राउझरमधील सेव्ह माहिती चोरली जाऊ शकते.

सावधगिरी बाळगा: ऑनलाईन हल्लेखोर आणि हॅकर्सनी कोरोना विषाणूबद्दल माहिती देणारे अधिकृत वेबसाइट आणि अ‍ॅपप्रमाणेच स्वत:चे प्लॅटफॉर्म तयार केले आहेत. याबाबत आपल्याला एखादी लिंक दिली जाते. आपण माहिती मिळावी यादृष्टीने त्यावर क्लिक देखील करता. त्याचवेळी आपल्या परवानगीशिवाय मालवेअर सॉफ्टवेअर आपल्या फोन किंवा कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल होतं. ज्यामुळे आपली माहिती चोरी होऊ शकते. हे टाळण्यासाठी ऑनलाइन किंवा मेसेजवर आलेल्या अविश्वसनीय लिंकवर क्लिक करणे टाळा. वेबसाइट्सकडे पाहता काळजी घ्या आणि त्यांच्या यूआरएलकडे लक्ष द्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी