जुनी १, ५, १० रुपयांची नोट विकून कमवा दीड ते पाच लाख रुपये

जुनी १, ५, १० रुपयांची नोट विकून दीड ते पाच लाख रुपयांपर्यंत कमाई करण्याची सुवर्णसंधी आहे. फक्त विशिष्ट वैशिष्ट्य असलेली जुनी नोट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

Your old Re 1, Rs 5, Rs 10 notes can fetch you anywhere from Rs 1.5 lakh to 5 lakh
जुनी १, ५, १० रुपयांची नोट विकून कमवा दीड ते पाच लाख रुपये 

थोडं पण कामाचं

  • जुनी १, ५, १० रुपयांची नोट विकून कमवा दीड ते पाच लाख रुपये
  • नोटेच्या सीरियल नंबरमध्ये सलग १२३४५ किंवा १२३४५६ असे आकडे असतील तर ही नोट दुर्मिळ आणि मौल्यवान
  • जुन्या नोटेत सलग ७८६ असे आकडे असतील तर ही नोट मौल्यवान समजली जाते

मुंबईः जुनी १, ५, १० रुपयांची नोट विकून दीड ते पाच लाख रुपयांपर्यंत कमाई करण्याची सुवर्णसंधी आहे. फक्त विशिष्ट वैशिष्ट्य असलेली जुनी नोट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. काही वेबसाइटवर जुन्या नाण्यांसाठी आणि नोटांसाठी हौशी व्यक्तींकडून मागणी नोंदवली जाते. ही हौशी मंडळी त्यांना हवी असलेली विशिष्ट नाणी किंवा विशिष्ट नोट खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम मोजायला तयार असतात. य वेबसाइटवर स्वतःजवळची विशिष्ट वैशिष्ट्य असलेली जुनी १, ५, १० रुपयांची नोट विकून दीड ते पाच लाख रुपयांपर्यंत कमाई करता येईल. कदाचित यापेक्षा जास्त रक्कमही मिळेल. Your old Re 1, Rs 5, Rs 10 notes can fetch you anywhere from Rs 1.5 lakh to 5 lakh

जर आपल्याकडे असलेल्या जुन्या नोटेच्या सीरियल नंबरमध्ये सुरुवातीला किंवा शेवटी सलग १२३४५ किंवा १२३४५६ असे आकडे असतील तर ही अतिशय दुर्मिळ आणि मौल्यवान नोट समजली जाते. अशा नोटेला हौशी मंडळी मोठी किंमत मोजतात. अनेकदा अशी एखादी दुर्मिळ नोट आपल्याला पाच लाख रुपये सहज मिळवून देऊ शकेल. 

जर आपल्याकडे असलेल्या जुन्या नोटेत सलग ७८६ असे आकडे असतील तर ही नोट मौल्यवान समजली जाते. इस्लाम धर्मात ७८६ हा अतिशय पवित्र आकडा आहे. यामुळेच या नोटेसाठी हौशींकडून आपल्याला मोठी कमाई होऊ शकते.

ज्या शंभर रुपयांच्या भारतीय नोटेवर माजी गव्हर्नर डी सुब्बाराव के यांची सही आहे आणि नोटेच्या सीरियल नंबरमध्ये 000786 असे आकडे सलग आहेत अशा एका नोटेला अलिकडेच एका व्यक्तीने १९०० रुपयांत खरेदी केले. याआधी अशीच एक नोट ऑनलाइन लिलावात तीन लाख रुपयांना विकली गेली होती. 

माता वैष्णवदेवीचे चित्र असलेल्या पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांना हौशींकडून मोठी मागणी आहे. काही मंडळींनी माता वैष्णवदेवीचे चित्र असलेल्या पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांची विक्री करुन लाखोंची कमाई केली आहे. 

हल्ली एक रुपयाची नाणी सहज मिळतात पण एक रुपयाची नोट आढळत नाही. यामुळे एक रुपयाच्या नोटांना विशेष मागणी आहे. माजी गव्हर्नर एचएम पटेल यांची सही असलेल्या एक रुपयाच्या नोटेसाठी एका हौशी व्यक्तीने ४५ हजार रुपये मोजल्याची घटना अलिकडेच घडली आहे. 

इंग्रजांच्या काळातील दहा रुपयांची नोट, माजी गव्हर्नर सीडी देशमुख यांची सही असलेली २५ हजार रुपयांची नोट आणि व्हिक्टोरिया राणीचा चेहरा उमटवलेली नाणी यांच्यासाठी हौशींकडून दीड लाख रुपयांपर्यंत मोठी रक्कम मोजण्यात आली आहे.

दुर्मिळ नाणी आणि दुर्मिळ नोटा यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार eBay, Quikr, CoinBazar या वेबसाइटवर मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. दुर्मिळ नाणी आणि दुर्मिळ नोटा यांचा संग्रह करणाऱ्यांकडून विशिष्ट नाणी आणि विशिष्ट नोटांसाठी मोठी रक्कम मोजली जात आहे. आपल्याकडे दुर्मिळ नाणे किंवा दुर्मिळ नोट असल्यास eBay, Quikr, CoinBazar या वेबसाइटवर ऑनलाइन लिलाव करुन अथवा थेटपणे विकून आपण लाखो रुपयांची कमाई सहज करू शकाल.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी