PF Account Benefit | तुमच्या पीएफ खात्याबरोबर ७ लाखांचा हा फायदा मोफत मिळतो, पाहा कसे

EDLI Scheme benefits | पीएफ खात्याबरोबर इतरही काही फायदे (Benefits with PF account) मिळतात. अनेकांना या फायद्यांबद्दल माहितच नसते. पीएफ खात्याद्वारे मिळणारा असाच एक फायदा म्हणजे कोणताही हफ्ता न भरता मिळमारा विम्याचा फायदा. एम्प्लॉयीज डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स किंवा ईडीएलआय योजना (EDLI Scheme), १९७६ अंतर्गत पीएफ खातेधारक हा आयुर्विम्याच्या (Life Insurance)लाभासाठी पात्र ठरतो. पीएफ खातेधारकाला कोणताही हफ्ता न भरता ७ लाख रुपयांपर्यतच्या विम्याचा लाभ मिळतो.

PF Account benefits
पीएफ खातेधारकाला मिळणारे फायदे 
थोडं पण कामाचं
  • पीएफ खात्यावर मिळतात इतरही अनेक फायदे
  • ईपीएफओची पीएफ खातेधारकांसाठीची ईडीएलआय योजना
  • ईडीएलआय योजनेअंतर्गत मिळतो ७ लाख रुपयांपर्यतचा आयुर्विमा मोफत

EDLI Scheme with PF Account | नवी दिल्ली : प्रत्येक नोकरदार व्यक्तीचे पीएफ खाते (PF Account) असते. पीएफ खात्यात जमा होणारी रक्कम ही भविष्यातील आर्थिक तरतुदींसाठी महत्त्वाची असते. मात्र तुमच्या पीएफ खात्याचा एवढाच फायदा नसतो. पीएफ खात्याबरोबर इतरही काही फायदे (Benefits with PF account) मिळतात. अनेकांना या फायद्यांबद्दल माहितच नसते. पीएफ खात्याद्वारे मिळणारा असाच एक फायदा म्हणजे कोणताही हफ्ता न भरता मिळमारा विम्याचा फायदा. एम्प्लॉयीज डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स किंवा ईडीएलआय योजना (EDLI Scheme), १९७६ अंतर्गत पीएफ खातेधारक हा आयुर्विम्याच्या (Life Insurance)लाभासाठी पात्र ठरतो. पीएफ खातेधारकाला कोणताही हफ्ता न भरता ७ लाख रुपयांपर्यतच्या विम्याचा लाभ मिळतो. ही सुविधा ईपीएफओद्वारे (EPFO)चालवली जाते. मात्र ईडीएलआय योजना ही फक्त विम्यापर्यत मर्यादित नसून यातून इतरही फायदे पीएफ खातेधारकाला मिळतात. (Your PF account comes with free benefit of Rs 7 lakhs, check the details)

पीएफ खातेधारकाला आपोआप मिळतात फायदे

पीएफ खातेधारकाच्या नॉमिनीला किंवा कायदेशीर वारसाला ७ लाख रुपयांपर्यतचा विम्याचा लाभ मिळू शकतो. ईपीएफ सदस्य असलेली व्यक्ती सेवेत असताना तिचा मृत्यू झाल्यास हा विम्याचा लाभ मिळतो. आधी विमा संरक्षणाची रक्कम ६ लाख रुपये होती. एप्रिल २०२१ पासून ती वाढवून ७ लाख रुपये करण्यात आली आहे. ईडीएलआयच्या योजनेअंतर्गत कमाल विमा संरक्षण ७ लाख रुपयांपर्यत मिळते. तर किमान विमा संरक्षण २.५ लाख रुपयांचे मिळते. हा फायदा पूर्णपणे मोफत असतो. शिवाय यासाठी कोणतीही प्रक्रिया करावी लागत नाही. कर्मचारी ईपीएफओचा सदस्य झाल्यानंतर आपोआपच ईडीएलआय योजनेचे फायदे मिळतात. अर्थात विम्याचा क्लेम करण्यासाठी ईपीएफओकडे फॉर्म भरावा लागतो.

कर्मचाऱ्यांना मिळतो विम्याचा लाभ

लेबर मिनिस्ट्री म्हणजेच कामगार मंत्रालयाचा हा आदेश एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्सशी (EDLI) संबंधित आहे. जर एखाद्या ईपीएफओ खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना या विम्याचा लाभ मिळतो. अर्थात ईडीएलआयच्या (Employees Deposit Linked Insurance Scheme)लाभार्थींची संख्या ईपीएफओ खातेधारकांइतकी नाही. ईडीएलआय अंतर्गत जवळपास २० लाखांपेक्षा जास्त कर्मचारी येतात. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक ईडीएलआय खातेधारक हा ईपीएफ खातेधारक असतोच मात्र प्रत्येक ईपीएफओ खातेधारक हा ईडीएलआय खातेधारक नसतो.

Read Also : जबरदस्त! कर्मचाऱ्यांना मिळणार ३०० पगारी सुट्ट्या, पाहा कधी

विम्याच्या रकमेत वाढ

कामगार मंत्रालयाने २८ एप्रिल २०२१ला ईडीएलआय योजनेअंतर्गत कमाल विमा रक्कम वाढून ७ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रालयाने तशी अधिसूचना जारी केली होती. अधिसूचना लागू झाल्याबरोबर विम्याची वाढीव मर्यादा लागू झाली आहे. ईडीएलआय योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या आजारपणाने, अपघाताने किंवा नैसर्गिक कारणाने मृत्यू झाल्यास क्लेम करता येतो. यात कर्मचाऱ्याला कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही. जर योजनेअंतर्गत कोणतेही नॉमिनेशन झाले नाही तर मृत कर्मचाऱ्याच्या पत्नी किंवा मुले त्याचे लाभार्थी असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी