Zomato ने 225 शहरांमधून गाशा गुंडाळला, कंपनीचा तोटा 5 पट वाढला, अहवालात उघड

Zomato Exits: Zomato ने आपल्या तिमाही अहवालाच्या आधारे काही निर्णय घेतले आहेत. कंपनीने आपल्या भागधारकांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. संपूर्ण तपशील जाणून घ्या.

zomato exits 225 smaller cities
Zomato ने 225 शहरांमधून गाशा गुंडाळला कंपनीचा तोटा 5 पट वाढला, अहवालात उघड  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • झोमॅटोचे नुकसान वाढले
  • 225 लहान शहरांमधून बाहेर पडत आहे
  • खराब कामगिरीमुळे कंपनीने हे पाऊल उचलले

मुंबई : देशातील ऑनलाइन फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या Zomato या कंपनीशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या महिन्यात झोमॅटोने जवळपास 225 छोट्या शहरांमधून बाहेर पडली आहे. म्हणजेच आता झोमॅटोने या शहरांमधील व्यवसाय बंद केला आहे. कंपनीच्या डिसेंबर-तिमाहीच्या कमाईच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. (zomato exits 225 smaller cities)

अधिक वाचा : Bigg Boss 16 Finale : Salman Khan च्या शो च्या विनर ट्रॉफीचा FIRST PIC झाला लीक

कंपनीने भागधारकांना पत्र लिहिले

Zomato चे मुख्य वित्तीय अधिकारी अक्षांत गोयल यांनी कंपनीच्या भागधारकांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात आम्ही जवळपास 225 लहान शहरांमधून बाहेर पडलो आहोत, कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाही (Q3FY23) शी संबंधित अहवाल जारी केला आहे. ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यूच्या (GOV) 0.3 टक्के योगदान दिले आहे. गोयल यांनी भागधारकांना सांगितले की हे एक आव्हानात्मक वातावरण आहे, परंतु आम्ही अलीकडच्या आठवड्यात मागणीत सुधारणा पाहत आहोत, ज्यामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळतो की सर्वात वाईट परिस्थिती संपली आहे.

अधिक वाचा : सचिन तेंडुलकरने केली वेगवान कारची सफर; आनंद महिंद्रा म्हणाले- मास्टर ब्लास्टर ऑन व्हील्स 

1,000 हून अधिक शहरांमध्ये व्यवसाय 

Zomato च्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या वर्षी 2021-22 मध्ये, कंपनी देशातील 1,000 हून अधिक शहरांमध्ये फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी व्यवसाय चालवत होती. जे आता मर्यादित झाले आहे. गोयल म्हणाले की, गेल्या काही तिमाहीत या (225) शहरांच्या खराब कामगिरीमुळे आम्हाला हे करावे लागले. 

अधिक वाचा : India vs Australia : ऑस्ट्रेलिया विरुद्धची नागपूर टेस्ट जिंकूनही भारताला 4 खेळाडूंची चिंता

कंपनीचा तोटा 5 पटीने वाढला

गुरुग्रामस्थित झोमॅटो कंपनीचे म्हणणे आहे की ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत तिचा महसूल 75 टक्क्यांनी वाढून 1,948 कोटी रुपये झाला आहे. याच कंपनीचा तोटा 5 पटीने वाढून 346 कोटी रुपये झाला आहे. वर्ष-दर-वर्ष आधारावर, ३१ डिसेंबर रोजी संपलेल्या ३ महिन्यांच्या कालावधीसाठी कंपनीच्या महसुलात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी Zomato ने सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत रु. 1,581 कोटी आणि डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत रु. 1,200 कोटींच्या तुलनेत रु. 1,565 कोटींचा समायोजित महसूल पोस्ट केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी