मुंबई : BSE वर शुक्रवारी, झोमॅटोचे शेअर्स 57.65 रुपयांच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचले आणि बाजारात जोरदार विक्री झाली. सध्या, स्टॉक त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून 66 टक्क्यांपर्यंत खाली आहे. 16 नोव्हेंबर 2021 रोजी Zomato च्या शेअरची किंमत 169.10 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. वर्ष-दर-वर्ष आधारावर समभाग 57 टक्क्यांहून खाली आला आहे.
अधिक वाचा : Indian Railways update: रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये केले बदल, तुम्हाला मिळणार मोठा फायदा, पाहा कसा
झोमॅटोच्या आयपीओने शेअर बाजारात धमाकेदार एंट्री केली. NSE वर, समभाग 76 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 116 रुपये किंवा 52.63 टक्के वाढीसह उघडला. 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत Zomato ने 63 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे.
अधिक वाचा : Banking Update | या सरकारी बँकेवर मोठे संकट, बंद कराव्या लागणार 600 शाखा, तुमचे खाते आहे का यात, लगेच चेक करा
Zomato ने मागील वर्षीच्या कालावधीत रु. 352.6 कोटी आणि मागील सप्टेंबर तिमाहीत रु. 429 कोटींचा निव्वळ तोटा नोंदवला होता. ऑपरेशन्समधील महसूल 82.47 टक्क्यांनी वाढून 1,112 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 609.4 कोटी रुपये होता.
गेल्या महिन्यात, भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) स्पर्धा कायद्याच्या कलम 3(1) आणि 3(4) च्या कथित उल्लंघनाशी संबंधित, खाद्य वितरण कंपन्या, Swiggy आणि Zomato च्या ऑपरेशन्स आणि बिझनेस मॉडेलची चौकशी करण्याचे आदेश दिले. यानंतर झोमॅटोच्या शेअरची विक्री वाढली.