मुंबई : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato चे शेअर्स: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सुनामीने गुंतवणूकदारांना घाम फोडला, मग कंपनी बोर्डालाही विचार करायला भाग पाडले. परिस्थिती अशी आहे की, सोमवार आणि मंगळवारी गेल्या दोन दिवसांत स्टॉक 21 टक्क्यांनी तुटला आहे. अशा स्थितीत बोर्डाने एवढी तडकाफडकी पाऊले उचलली की शेअर्सच्या घसरणीला लगेचच ब्रेक लागला. (Zomato to distribute 4.66 crore shares for Rs 1-1, stock movement changed due to news)
अधिक वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आनंदी-आनंद गडे; तीन आठवड्यानंतर मिळणार प्रमोशन लेटर
वास्तविक, कंपनीने शेअर्समधील घसरण थांबवण्यासाठी एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन (ESOP) निवडला आहे. या अंतर्गत, झोमॅटोच्या नामांकन आणि पारिश्रमिक समितीने स्टॉक पर्यायांतर्गत कर्मचाऱ्यांना 4,65,51,600 इक्विटी शेअर्स देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. कंपनी आता प्रत्येकी 1 रुपये दराने 4.66 कोटी शेअर्स आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित करेल. तोट्यात असतानाही कंपन्या त्यांच्या उच्च अधिकार्यांना ESOP चे वितरण करतात.
झोमॅटोने मंगळवारी शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत बोर्डाने या निर्णयाला मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. झोमॅटोच्या कर्मचार्यांमध्ये वितरित केल्या जाणार्या शेअर्सचा सध्याचा दर पाहिल्यास त्यांचे मूल्य 193 कोटी रुपये आहे. ईएसओपी योजनेला बोर्डाने मंजुरी दिल्याच्या वृत्ताचाही मोठा परिणाम झाला आणि बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांहून अधिक झेप घेऊन 43.85 रुपयांवर पोहोचले.
अधिक वाचा :टिकटॉक आणि यूट्यूबमुळे Facebook तोट्यात?, सीईओ मार्क झुकरबर्गने गमावली अर्धी संपत्ती, घरही विकले
Zomato च्या शेअर्समधील घसरणीवर नजर टाकली तर आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी तो 14 टक्क्यांपर्यंत तुटला होता, तर मंगळवारी तो 12 टक्क्यांहून अधिक घसरला होता. या घसरणीमुळे कंपनीच्या शेअर्सची किंमत 41 रुपयांवर पोहोचली होती. एक वर्षाचा लॉक-इन कालावधी संपल्यानंतर शेअर्समध्ये मोठी विक्री होईल, अशी भीती तज्ज्ञांना आधीच होती आणि तसेच झाले.
बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, 23 जुलै 2021 रोजी झोमॅटोचे शेअर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. त्याची इश्यू किंमत 76 रुपये निश्चित करण्यात आली होती. त्याचे शेअर्स BSE आणि NSE वर 51 टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर 115 रुपयांवर सूचीबद्ध झाले. नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर्स 169 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या घसरणीतून कंपनी सावरताना दिसत नाही.