10th passed get job opportunity in Intelligence Bureau : उत्तम पगार, निवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन (निवृत्तीवेतन) आणि सुरक्षित नोकरी यामुळे अनेकांना सरकारी नोकरीचे आकर्षण असते. आता दहावी पास तरुण तरुणींना सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध आहे. ही संधी इंटेलिजन्स ब्युरो अर्थात भारताच्या गुप्तचर यंत्रणेत उपलब्ध आहे. इंटेलिजन्स ब्युरोत सिक्युरिटी असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदांवर भरती होणार आहे. । जॉब पाहिजे । काम-धंदा
इंटेलिजन्स ब्युरोत दहावी पास असलेल्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. या संधीबाबत सविस्तर माहिती mha.gov.in वर उपलब्ध आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील. अर्ज ऑनलाईन भरण्याची मुदत 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे. ही मुदत 17 फेब्रुवारी 2023 रोजी संपणार आहे.
सरकारी प्रसिद्धीपत्रकानुसार इंटेलिजन्स ब्युरोत सिक्युरिटी असिस्टंट 1521 जणांची भरती होणार आहे. तसेच 150 जणांची मल्टी टास्किंग स्टाफ या पदावर भरती होणार आहे. भरती प्रक्रिया राबवण्यासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. भरतीसाठी दहावी पास असलेले परीक्षा देऊ शकतील. इंटेलिजन्स ब्युरोतील भरतीसाठी 100 गुणांचा लेखी पेपर सोडवावा लागेल. हा पेपर सोडविण्यासाठी 60 मिनिटांचा अवधी दिला जाईल.
सिक्युरिटी असिस्टंट या पदासाठी किमान 18 आणि कमाल 27 वर्षे अशी वयाची अट आहे. मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी किमान 18 आणि कमाल 25 वर्षे अशी वयाची अट आहे.
इंटेलिजन्स ब्युरोत सिक्युरिटी असिस्टंट लेव्हल 3 साठी किमान मासिक पगार 21 हजार 700 रुपये ते कमाल मासिक पगार 69 हजार 100 रुपये दिला जाईल. मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी किमान मासिक पगार 18 हजार रुपये ते कमाल मासिक पगार 56 हजार 900 रुपये दिला जाईल.