CRPF Recruitment 2023 Notification: तुमच्या मनात लष्करात जाण्याची इच्छा असेल आणि सरकारी नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण CRPF मध्ये हेड हेड कॉन्स्टेबल किंवा एएसआयची (ASI)असिस्टंट सब-इन्स्पेक्टरसाठी भरती केली जाणार आहे. ज्यांना सरकारी नोकरी करायची असेल तर इच्छुक उमेदवारांनी त्वरीत अर्ज करा. या दोन्ही पदासाठी साधरण 1400 जागा भरल्या जाणार असून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (1458 Head Constable and ASI Recruitment in CRPF, Apply, Know Eligibility)
अधिक वाचा : Viral Video : माणसामुळे मगरीची 'टाय टाय फिश'
या अधिसुचनेनुसार, 143 जागा ह्या एएसआय या पदासाठी असणार आहेत, तर 1315 जागांसाठी हेड कॉन्स्टेबलसाठी भरती केली जाणार आहे. या दोन्ही पदांसाठी महिला आणि पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागणविण्यात येत आहेत.
सीआरपीएफमध्ये नोकरीची संधी आहे,याची माहिती तर तुम्हाला झाली. पण या पदांसाठी अर्ज कसा करायचा असा प्रश्न तुम्हाला आला असेल. हो ना ? आज आपण या लेखात याची माहिती जाणून घेणार आहोत. CRPF मध्ये हेड कॉन्स्टेबल किंवा असिस्टंट सब-इन्स्पेक्टरच्या पदांवर भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट नेटवर सुरू करावी लागेल.
अधिक वाचा : Tunisha Sharma: राम शिंदेंनंतर महाजनही म्हणाले लव्ह जिहाद
crpf.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या ऑनलाईन अप्लीकेशन फॉर्मच्या माध्यामातून अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया ही 4 जानेवारी पासून सूरू होणार असून उमेदवार 25 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतील. अर्ज करताना उमेदवारांना 100 रुपये परीक्षा शुल्क भरावा लागेल. हा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात. तर एससी, एसटी वर्गातील उमेदवारांना कोणताच शुल्क आकारण्यात आलेला नाही.
सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल(मिनिस्ट्रियल) पदासाठी अर्ज करणारे उमेदवारांनी कोणत्या तरी मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवारांना कॉम्प्यूटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यांना कॉम्प्यूटरवर टायपिंग करता आली पाहिजे. हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनीट टाइप करता आले पाहिजे.
अधिक वाचा : एक कॅबिनेट मंत्री आणि एक माजी मंत्री हॉस्पिटलमध्ये
तर एएसआयच्या स्टेनो पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर प्रति मिनीट 80 शब्द टाइप करता आली पाहिजेत. तर प्रति मिनीट या गतीने 10 मिनिटांपर्यंत शॉर्टहॅण्ड आणि 50 मिनिटामध्ये इंग्रजीत किंवा हिंदीत ट्रांस्क्रिप्शन करता आले पाहिजे.
सर्व पदासांठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 25 जानेवारी 2023 ला 18 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे. तसेच 25 वर्षापेक्षा अधिकच्या उमेदवारांना या पदासाठी अपात्र ठरवलं जाईल. तर प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार, वयात सुट देण्यात येईल.