'या' कंपनीत १५०० कर्मचाऱ्यांची भरती, तरुणांना मोठी संधी

जॉब पाहिजे
Updated May 09, 2019 | 16:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

केरी इंडेव्ह या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लॉजिस्टक कंपनीत १५०० रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता तरुणांना रोजगाराची एक चांगली संधी निर्माण झाली आहे.

jobs_GettyImages
'या' कंपनीत १५०० कर्मचाऱ्यांची भरती, तरुणांना मोठी संधी  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: केरी इंडेव्ह या लॉजिस्टिक कंपनीमध्ये तब्बल १५०० कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. कारण या कंपनीने आपली भारतातील सेवा अधिक विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असून अनेक तरुणांना त्याचा फायदा होणार आहे. केरी इंडेव्हने मुंबईमध्ये नुकतंच आठ नव्या लॉजिस्टिक सेवा सुरु केल्या आहेत. केरी इंडेव्ह ही एक जागतिक दर्जाची अशी लॉजिस्टिक कंपनी आहे. या कंपनीला आयएसओ ९००१-२०१५ हे मानांकन देखील देण्यात आलं आहे. या कंपनीचे अध्यक्ष झेव्हिअर ब्रिटो यांनी याबाबत बोलताना असं म्हटलं की, 'एक्सप्रेस सेवेच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना घरपोच सुविधा देणार आहे.' 

केरी इंडेव्ह ही कंपनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्राहकांना घरपोच सुविधा देण्याचं काम करते. एक्सप्रेस सेवेच्या पहिल्या टप्प्याचं संचालन हे तब्बल २०० केंद्रांमधून होणार आहे. यासाठी अनेक वाहनं आणि १५०० कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. यावेळी पार्सल लॉकर ही तंत्रज्ञानावर आधारित अशी नवी सेवाही कंपनीमार्फत दिली जाणार आहे.

या कंपनीने काही नव्या सेवा सुरु केल्या आहे. ज्यामध्ये सेम डे एक्सप्रेस, अर्ली एक्सप्रेस, प्रायॉरिटी पॅकेज एक्सप्रेस यासारख्या अनेक नव्या सेवांचा समावेश असणार आहे. या नव्या लॉजिस्टिक कंपनीच्या इतर क्षेत्रातील बऱ्याच कंपन्यांना देखील फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला देखील हातभार लागणार आहे. 

या कंपनीचे मुख्यालय हे हाँगकाँग येथे असून इथूनच त्यांचा इतर देशातील कारभार हाताळला जातो. तब्बल ५३ देशांमध्ये या कंपनीची कार्यालये आहे. त्यामुळे कंपनीची वार्षिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात आहे. केरी इंडेव्ह गी मालसाठा करणं. कंटेनर स्टेशन्स उपलब्ध करुन देणं यासारख्या सेवा देखील देतं. 

सध्या लॉजिस्टिक व्यवसायात मोठी उलाढाल होत असल्याचं दिसून येत आहे. ई-कॉमर्ससारख्या सेवांमुळे लॉजिस्टिकला मोठी मागणी आली आहे. त्यामुळे आता लॉजिस्टिक कंपन्या देखील आपला विस्तार वाढवत आहे. मुंबई आणि मुंबईच्या नजीक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात लॉजिस्टक कंपन्याचा विस्तार होत असल्यचं मागील काही वर्षांमध्ये दिसून आलं आहे. त्यामुळे येथे रोजगार निर्मितीला काही प्रमाणात हातभार लागला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी