कोरोना व्हायरसमुळे जगभरातील नोकऱ्यांवर संकट, ‘इतकी’ बेरोजगारी वाढू शकते: संयुक्त राष्ट्र

जॉब पाहिजे
Updated Mar 19, 2020 | 18:32 IST | टाइम्स नाऊ हिंदी

कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरातील जवळपास अडीच कोटी नोकऱ्यांवर संकट निर्माण होऊ शकतं. संयुक्त राष्ट्राच्या एका एजंसीनं एका रिपोर्टनुसार हा अंदाज वर्तवला आहे.जाणून घ्या कसा होतोय कोरोना व्हायरसचा नोकरीवर परिणाम

2.5 crore jobs could be lost worldwide due to coronavirus un
कोरोना व्हायरसमुळे जगभरात बेरोजगारीचं संकट  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • कोरोना व्हायरसमुळे जगभरात बेरोजगारीचं संकट
  • संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार जगभरात अडीच कोटी नोकऱ्यांवर येऊ शकते गदा
  • आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांना सज्ज राहण्याचं आवाहन

संयुक्त राष्ट्र: जगभरात कोरोना व्हायरसचं संकट गडद होतंय. या व्हायरसमुळे जगातील अनेक देश आर्थिक संकटात सापडले आहेत. शटडाऊन, लॉकडाऊन केल्यामुळे अनेक देशात लोकांना बाहेर पडणं शक्य होत नाहीय. या सर्वांचा परिणाम म्हणजे जगातील जवळपास अडीच कोटी नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. हा अंदाज वर्तवला आहे संयुक्त राष्ट्राच्या एका एजंसीनं. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर समिती गठित करून जागतिक बेरोजगारीवर कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्यात मदत होऊ शकते.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ)नं ‘कोविड-१९ आणि कार्यरत जग: प्रभाव आणि कारवाई’ या मथळ्याखाली आपल्या प्राथमिक मूल्यांकन रिपोर्टमध्ये कामगारांची सुरक्षा, अर्थव्यवस्थेला मदत आणि रोजगार कायम राखण्यासाठी तात्काळ, मोठ्या प्रमाणात आणि समन्वित उपायांचं आवाहन केलंय. आयएलओनं सांगितलं की, या उपायांमध्ये सामाजिक सुरक्षा प्रदान करणं, रोजगार कायम ठेवण्यासाठी मदत (म्हणजेच कमी तासांचं काम, वेतन कायम, इतर सब्सिडी) आणि लहान किंवा मध्यम उद्योगांसाठी आर्थिक मदत आणि टॅक्समध्ये दिलासा यांचा समावेश आहे.

आयएलओनं सांगितलं की, कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरात उभ्या राहिलेल्या आर्थिक आणि कामगार संकटांमुळे जगभरात जवळपास २.५ कोटी लोक बेरोजगार होऊ शकतात. रिपोर्टमध्ये सांगितलं गेलंय की, २००८ सारख्या संकटामध्ये जग दिसत होतं.

जागतिक जीडीपी विकासावर कोविड-१९ चा प्रभाव खूप वेगवेगळा बघायला मिळेल असा जागतिक श्रम संघटनेचा (ILO)चा अंदाज आहे. त्यांच्या अंदाजानुसार २०१९च्या १८ कोटी ८० लाखच्या आकडेवारीच्या आधारावर ५३ लाख (खालच्या) आणि २ कोटी ४७ लाख (उच्च) दरम्यान जागतिक बेरोजगारीत वाढ होऊ शकते. २००८-०९ सालच्या परिस्थितीशी तुलना केली तर जागतिक आर्थिक संकटामुळे जागतिक बेरोजगारीत २ कोटी २० लाखांची वाढ झाली. खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढू शकते.

रिपोर्टमध्ये सांगितलं गेलंय की, विकसनशील देशांमध्ये स्व-रोजगार जे नेहमी बदलांचा प्रभाव कमी करण्यात फायदेशीर ठरतात, यावेळी मात्र असे रोजगार काही फायदेशीर ठरू शकत नाहीत. कारण लोकांच्या येण्या-जाण्यावर आणि सामानाच्या आयात-निर्यातवर प्रतिबंध लावले गेले आहेत.

या रिपोर्टमध्ये सांगितलं गेलंय की, रोजगारामध्ये कमतरता म्हणजे कामगारांसाठी २०२० पर्यंत ८६० अब्ज अमेरिकन डॉलर आणि ३.४ ट्रिलियन दरम्यान उत्पन्नाचं मोठं नुकसान होऊ शकतं. तेव्हा काळजी घ्या आपली आणि आपल्या नोकरीचीही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...