खूशखबर! १०वी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेत ३५५३ जागांसाठी मेगा भरती

जॉब पाहिजे
Updated Jan 07, 2020 | 15:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

१०वी पास विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेमध्ये तब्बल ३५५३ जागांसाठी मेगा भरती निघालीय. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. जाणून घ्या कुठे करायचा अर्ज...

Job
खूशखबर! पश्चिम रेल्वेत ३५५३ जागांसाठी मेगा भरती 

मुंबई: पश्चिम रेल्वेमध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. त्यासंबंधी जाहिरात पश्चिम रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीनं उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आजपासून म्हणजेच मंगळवार ७ जानेवारी २०२० पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख ६ फेब्रुवारी २०२० आहे.

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुण-तरुणींसाठी ही एक चांगली संधी आहे. विशेष म्हणजे १०वी पास कुठल्याही विद्यार्थ्याला यासाठी अर्ज करता येणार आहे. तब्बल ३५५३ जागांसाठी ही पदभरती होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर rrc-wr.com यासंदर्भातची आधिक माहिती तुम्हाला मिळू शकेल.

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं किमान वय १५ आणि कमाल वय २४ वर्ष असावं. सरकारी नियमांनुसार आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयामध्ये सुट देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता – अर्ज करणाऱ्या उमेदवाराची प्रतिष्ठित बोर्डातून ५५ टक्के गुणांसह दहावी पास असावं. तसंच त्याच्याकडे ITI प्रमाणपत्रही बंधनकारक आहे.

प्रवेश फी – जनरल कॅटेगरीमधील उमेदवारला १०० रूपये फी असेल. तर महिला आणि आरक्षित वर्गाच्या उमेदरांना कोणतीही फी लागणार नाहीय.

जाणून घ्या अधिक माहिती, खालील पीडीएफ फाईलवर क्लिक करा 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी