रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागामध्ये प्रशिक्षणार्थीच्या ३५९१ जागा

आता भारतीय रेल्वे आपल्या पश्चिम विभागाचे मुख्यालय असलेल्या मुंबईत  प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५९१ जागा भरण्याचे ठरवले आहे.

3591 trainee posts in Indian Railways western railway recruitment may 2021
रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागामध्ये प्रशिक्षणार्थीच्या ३५९१ जागा 
थोडं पण कामाचं
  • आता भारतीय रेल्वे आपल्या पश्चिम विभागाचे मुख्यालय असलेल्या मुंबईत  प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५९१ जागा भरण्याचे ठरवले आहे.
  • यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. 
  • या काळात तुम्ही अर्ज करू शकतात आणि ही संधी पदरात पाडू घेऊ शकतात. 

मुंबई : महाराष्ट्रातील तरूणांची या कोरोनामुळे नोकरीच्या संधी हेरावून घेतल्या आहेत. अशातच आता भारतीय रेल्वे आपल्या पश्चिम विभागाचे मुख्यालय असलेल्या मुंबईत  प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५९१ जागा भरण्याचे ठरवले आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.  येत्या २५ तारखेपासून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर अंतीम दिनांक २४ जून २०२१ असणार आहे. या काळात तुम्ही अर्ज करू शकतात आणि ही संधी पदरात पाडू घेऊ शकतात. 

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्णसह संबंधित ट्रेडमधून आयटीआय प्रमाणपत्र धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ मे ते २४ जून २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

जाहिरात पाहाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

या लिंकवर ऑनलाइन अर्ज करा 

पश्चिम रेल्वेची अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी इथं क्लिक करा 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी