खुशखबर, ९६ हजार लोकांना मिळणार नोकरी, पाच आयटी कंपन्या करणार भरती 

आयटी क्षेत्रातील पहिल्या पाच कंपन्या चालू आर्थिक वर्षात 96 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.  

96 thousand people will get jobs five it companies are recruiting in 2021 22 says nasscom
खुशखबर, ९६ हजार लोकांना मिळणार नोकरी, पाच आयटी कंपन्या करणार 
थोडं पण कामाचं
  • आयटी क्षेत्रातील पहिल्या पाच कंपन्या चालू आर्थिक वर्षात 96 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.  
  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्र कुशल प्रतिभेची सर्वात मोठी भरती करणारे क्षेत्र बनले आहे असल्याचे आयटी कंपन्यांची वरिष्ठ संस्था नॅसकॉम म्हटले आहे.
  • ऑटोमेशन वाढल्यामुळे 2022 पर्यंत सॉफ्टवेअर कंपन्या 30 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे, असा अहवाल बँक ऑफ अमेरिकेने दिला होता.

नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील पहिल्या पाच कंपन्या चालू आर्थिक वर्षात 96 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.  

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र कुशल प्रतिभेची सर्वात मोठी भरती करणारे क्षेत्र बनले आहे असल्याचे आयटी कंपन्यांची वरिष्ठ संस्था नॅसकॉम म्हटले आहे. अलीकडेच बँक ऑफ अमेरिकेने एका अहवालात अंदाज व्यक्त केला आहे की ऑटोमेशन वाढल्यामुळे 2022 पर्यंत सॉफ्टवेअर कंपन्या 30 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. यातील बहुतेक तंत्रज्ञान क्षेत्रातील असतील.

नॅसकॉमने एका निवेदनात म्हटले आहे की, “तंत्रज्ञानाचा विकास आणि ऑटोमेशन वाढीमुळे पारंपारिक आयटी नोकऱ्या आणि भूमिकेचे स्वरूप सर्वांगीणदृष्ट्या विकसित होईल आणि त्यामुळे नवीन नोकर्‍या मिळतील. आयटी क्षेत्राने कुशल प्रतिभा क्षेत्रातील नोकरीसाठी सर्वात जास्त संख्या तयार केली आहे आणि वित्त वर्ष 2021 मधील 1,38,000 लोकांना नोकरी दिली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात 96 हजाराहून अधिक जणांची आयटी कंपन्यांची भरती करण्याची जोरदार योजना तयार केली असल्याचे नॅसकॉमने यावर जोर दिला.

नॅसकॉमने अहवाल दिला आहे की भारतातील बिझिनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) क्षेत्र, जे ऑटोमेशनसाठी एक परिपक्व क्षेत्र आहे असे म्हटले जाते, त्यामध्ये 1.4 दशलक्षाहूनही अधिक लोक (घरगुती आणि घरातील वगळता) नोकरी करतात. मार्च 2021 पर्यंत आयटी-बीपीएम क्षेत्रात एकूण 45 लाख लोक कार्यरत आहेत.

असोसिएशनने म्हटले आहे की ऑटोमेशन आणि आरपीए (रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन) गेल्या तीन वर्षात परिपक्व होत आहेत आणि यामुळे बीपीएम क्षेत्रासाठी रोजगार निर्माण झाले आहेत.

अलीकडेच बँक ऑफ अमेरिकेने एका अहवालात म्हटले आहे की 2022 पर्यंत देशांतर्गत सॉफ्टवेअर कंपन्या 3 दशलक्ष कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकतील. यामुळे या कंपन्यांचे 100 अब्ज डॉलर्स बचत होईल, कंपन्या यापैकी बहुतांश बचत पगारावर खर्च करतात. नॅसकॉमच्या मते, देशांतर्गत आयटी क्षेत्रात जवळपास 16 दशलक्ष लोक काम करतात, त्यातील 9 दशलक्ष कमी कौशल्य सेवा आणि बीपीओ सेवांमध्ये आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी