Agniveer Recruitment : अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल; जाणून घ्या भरतीपासून ट्रेनिंगपर्यंतचे निकष

New Process Of Agniveer Recruitment : भारतीय सैन्य दलातील (Indian Amry) भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. अग्निवीर भरती प्रक्रिया (Agniveer Recruitment Process) आता नवीन निकषांवर होणार आहे.  जुन्या प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

:Change in Agniveer recruitment process; Read what is in detail Change
अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल; वाचा सविस्तर काय आहे Change  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अग्निवीर भरती प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे.
  • भरती प्रक्रियेतील या बदलासंदर्भात फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत अधिसूचना जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
  • भरतीसाठी पहिली ‘ऑनलाइन’परीक्षा एप्रिलमध्ये देशभरात सुमारे 200 ठिकाणी होण्याची शक्यता आहे.

New Process Of Agniveer Recruitment In Indian Army : भारतीय सैन्य दलातील (Indian Amry) भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. अग्निवीर भरती प्रक्रिया (Agniveer Recruitment Process) आता नवीन निकषांवर होणार आहे.  जुन्या प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आता अग्निवीर भरती प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे.

अधिक वाचा  : चांगली झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी खा ही फळे

भरतीस इच्छुक उमेदवारांना आता प्रथम ‘ऑनलाइन’ सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) (CEE)द्यावी लागेल. यानंतर उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (Physical Test)आणि वैद्यकीय तपासणीस  (Medical Test)सामोरे जावे लागेल. भरती प्रक्रियेतील या बदलासंदर्भात फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत अधिसूचना जाहीर होण्याची अपेक्षा असल्याचे सूत्रांनी शनिवारी सांगितले. भरती प्रक्रियेचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत हा बदल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.  

अधिक वाचा  : मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावेळी वेगळ्या विदर्भासाठी घोषणा

दोनशे ठिकाणी  होणार परीक्षा

दरम्यान, आधीच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत उमेदवारांना प्रथम शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि नंतर अंतिम टप्प्यावर प्रवेश परीक्षा द्यावी लागत असे. मात्र, आता ‘ऑनलाइन’प्रवेश परीक्षा हा पहिला टप्पा असेल.   भरतीसाठी पहिली ‘ऑनलाइन’परीक्षा एप्रिलमध्ये देशभरात सुमारे 200 ठिकाणी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या बदलामुळे भरती मेळाव्यादरम्यान होणारी गर्दी कमी होईल. त्यामुळे भरती प्रक्रियेचे आयोजन-व्यवस्थापन करणे सोपे होईल, असे मानले जाते.

अशी असेल  CEE परीक्षा 

नवीन भरती प्रक्रियेअंतर्गत, भरतीसाठी परीक्षा म्हणजेच, सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल. या परीक्षेसाठी 60 मिनिटे म्हणजेच, एक तासाचा वेळ देण्यात येईल. यासाठी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जावं लागेल. एप्रिल 2023 मध्ये होणाऱ्या CEE साठी 200 परीक्षा केंद्रे असतील. परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जारी केली जाईल.  यासाठी अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची फेब्रुवारी 2023 च्या मध्यापर्यंत आहे. 

अधिक वाचा  : राज्यातील रेल्वे प्रकल्पांना अर्थमंत्र्यांकडून निधीची गती

शारीरिक चाचणी

CEE परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. दुसऱ्या टप्प्यांतर्गत होणाऱ्या शारीरिक चाचणीमध्ये महिला आणि पुरुष दोघांसाठीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. महिला उमेदवारांना आठ मिनिटांत 1.6 चा रनिंग स्केल पार करावा लागेल. एवढेच नाहीतर 15 सिट-अपसह 10 पुश-अप पूर्ण करावे लागतील. 

अधिक वाचा  : संत रोहिदास जयंतीनिमित्त प्रेरणादायी Quotes शेअर करा

तर पुरुषांना 6:30 मिनिटांत 1.6 किमी धावावे लागेल, त्यानंतर 20 सिट-अप आणि 12 पुश-अप करावे लागतील. यामध्ये यशस्वी झालेल्या महिला आणि पुरुष उमेदवार तिसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी पात्र ठरतील.

वैद्यकीय चाचणी 

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी वैद्यकीय चाचणी ही शेवटची फेरी असेल. यामध्ये सैन्य दलाने घालून दिलेल्या नियमांनुसार, प्रकृती आणि शारीरिक तंदुरुस्ती योग्य असल्यास उमेदवारांना अग्निवीर बनण्याची संधी मिळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी