भारतीय हवाई दलात अग्नीवीर वायूची भरती; अर्ज घेण्यास सुरुवात, जाणून घ्या कुठे अन् कसा कराल अर्ज

अग्निवीर भर्ती 2023 साठी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, IAF ऑनलाईन पद्धतीने आज संध्याकाळी 5 वाजेपासून नोंदणी सुरू करेल. नोंदणी सुरू झाल्यावर, उमेदवारांच्या फायद्यासाठी अग्निवीर वायु नोंदणीची थेट लिंक येथे शेअर केली जाईल.  अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी उमेदवार खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचा संदर्भ घेऊ शकतात.

gniveer Vayu Recruitment in Indian Air Force
भारतीय हवाई दलात अग्नीवीर वायूची भरती  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • IAF ऑनलाईन पद्धतीने आज संध्याकाळी 5 वाजेपासून नोंदणी सुरू करेल.
 • अग्निवीर वायु 2023 नोंदणीसाठी अधिकृत वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा.
 • अग्निवरवायू भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे.

नवी दिल्ली : नोकरी (job) करण्याच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी (candidates)आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलात भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना एअरफोर्समध्ये नोकरी करायची आहे,अशा उमेदवारांनी हातातील संधी न गमावता आजचं अर्ज करा. भारतीय हवाई दल (Indian Air Force), IAF आज 7 नोव्हेंबर 2022 पासून अग्निवीर वायु नोंदणी 2023 सुरू करणार आहे. भारतीय हवाई दलाच्या अंतर्गत अग्निपथ भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार आज संध्याकाळपासून अधिकृत वेबसाइट – agnipathvayu.cdac.in वर त्यांचे अर्ज सबमिट करू शकणार आहेत.  (Agniveer Vayu Recruitment in Indian Air Force; Start applying, know where and how to apply) 

अधिक वाचा  : शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या प्रमुखांचे पुत्र आमने - सामने

अग्निवीर भर्ती 2023 साठी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, IAF ऑनलाईन पद्धतीने आज संध्याकाळी 5 वाजेपासून नोंदणी सुरू करेल. नोंदणी सुरू झाल्यावर, उमेदवारांच्या फायद्यासाठी अग्निवीर वायु नोंदणीची थेट लिंक येथे शेअर केली जाईल.  अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी उमेदवार खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचा संदर्भ घेऊ शकतात.

अधिक वाचा  : बनावट अंडी बिघडवू शकतात तुमचं आरोग्य

Agnipath Recruitment 2022: अग्निवीर वायु 2023 साठी अर्ज कसा करावा

 • IAF अग्निपथ भरतीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या -  agnipathvayu.cdac.in.
 • होमपेजवर, अग्निवीर वायु 2023 नोंदणीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
 • तुमचे तपशील जसे की नाव, ईमेल पत्ता, जन्मतारीख आणि मागितलेली इतर माहिती एंटर करा.
 • अर्ज भरा, सर्व कागदपत्रे अपलोड करा.
 • अर्ज फी  असल्यास ती भरा आणि फॉर्म सबमिट करा.
 • डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी प्रिंटआउट घ्या.

 उमेदवारांनो लक्षात ठेवा  अग्निवरवायू भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे. 23 नोव्हेंबर 2022 रोजी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करण्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ असेल.

अधिक वाचा  : कंटेंटच्या माध्यामातून Twitterवर कमवता येणार पैसा

Agnipath Recruitment 2022: अग्निवीर वायु 2023 महत्वाचे तपशील

 • Post -अग्निवीर वायु
 • Organisation- भारतीय हवाई दल - अग्निपथ भरती
 • Registrations नोंदणी - 7 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख-     23 नोव्हेंबर 2022 संध्याकाळी 5 वाजता.
 • वयोमर्यादा-    27 जानेवारी 2002 आणि 27 डिसेंबर 2005 दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता-

 (any one)    गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह बारावी उत्तीर्ण. एकूण 50% असणं आवश्यक आहे. तर इंग्रजी या विषयात एकूण  50% हवे. तीन वर्षांचा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात 50%  असावेत. तसेच यातील  इंग्रजी या विषयात 50 टक्के मार्क असणं आवश्यक आहे. दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम बिगर व्यावसायिक विषयांसह - भौतिकशास्त्र आणि गणित 50% असणं आवश्यक तसेच इंग्रजी विषयात 50% मार्क हवेत. 12वी पास एकूण 50%  हवे तसेच इंग्रजीतही 50 टक्के मार्क हवे.  (Non-Science subjects) दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रमात इंग्रजीसह एकूण 50% मार्क असावेत. (Non-Science subjects)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी