Air Force ने शेअर केले डिटेल्स; अग्निवीरांना एक कोटीचा विमा, 30 दिवसांच्या सुट्ट्या अन् असेल कॅन्टीनची सुविधा

केंद्र सरकारने (Central Government) अग्निपथ योजना (Agneepath Yojana) सुरू केली आहे. यावरून देशभरात खळबळ उडाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करत आहेत. दरम्यान, भारतीय हवाई दलाने  (Indian Air Force) अग्निपथ योजनेचे तपशील त्यांच्या वेबसाइटवर शेअर केले आहेत. वायुसेनेने अग्निपथ योजनेंतर्गत भरतीच्या सुट्ट्या आणि इतर लाभांबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे.

Agniveer will have canteen facilities and insurance from Air Force
अग्निवीरांना Air Force कडून असेल कॅन्टीनची सुविधा अन् विमा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वायुसेनेने अग्निपथ योजनेंतर्गत भरतीच्या सुट्ट्या आणि इतर लाभांबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे.
  • भारतीय वायुसेनेत 4 वर्षांसाठी एका वर्षात 30 दिवस म्हणजे महिनाभर सुट्ट्या मिळतील.
  • सर्व अग्निवीरांना एकूण 48 लाख रुपयांचा विमा दिला जाईल.

Detail About Agnipath Scheme: केंद्र सरकारने (Central Government) अग्निपथ योजना (Agneepath Yojana) सुरू केली आहे. यावरून देशभरात खळबळ उडाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करत आहेत. दरम्यान, भारतीय हवाई दलाने  (Indian Air Force) अग्निपथ योजनेचे तपशील त्यांच्या वेबसाइटवर शेअर केले आहेत. वायुसेनेने अग्निपथ योजनेंतर्गत भरतीच्या सुट्ट्या आणि इतर लाभांबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. दरम्यान, मिळणाऱ्या या सुविधा दिल्या जातील त्या कायमस्वरूपी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळतील. वायुसेनेच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या माहितीनुसार, पगारासह अग्निवीरांना हार्डशिप भत्ता, गणवेश भत्ता, कॅन्टीन सुविधा आणि वैद्यकीय सुविधा देखील मिळतील. या सुविधा नियमित सैनिकाला मिळतात.

सामान्य सैनिकांसारख्या सुविधा 

वायुसेनेच्या वेबसाइटनुसार, अग्निवीरांना भारतीय वायुसेनेत 4 वर्षांसाठी एका वर्षात 30 दिवस म्हणजे महिनाभर सुट्ट्या मिळतील. यासोबतच अग्निवीरांना कॅन्टीनची सुविधाही मिळणार आहेत. गणवेशाशिवाय हवाई दलाकडून अग्निवीरांना विमा संरक्षणही दिले जाणार आहे, हा विमा तब्बल एक कोटी रुपयांचा असणार आहे. अग्निपथ योजनेतून आलेल्या अग्निवीरांना त्या सर्व सुविधा पुरविल्या जातील, ज्या सामान्य सैनिकासाठी उपलब्ध आहेत. 

अग्निवीरांना या सुविधा मिळणार  

  • वायुसेनेनुसार, पगारासोबत अग्निवीरांना कष्ट भत्ता, गणवेश भत्ता, कॅन्टीन सुविधा आणि वैद्यकीय सुविधाही मिळतील. या सर्व सुविधा सामान्य सैनिकाप्रमाणे असतील. 
  • अग्निवीरांना प्रवास भत्ताही मिळेल.
  • अग्निपथ योजनेतून आलेल्या अग्निवीरांना वर्षातून ३० दिवसांची रजा मिळणार आहे. याशिवाय गरज भासल्यास वैद्यकीय रजेचाही पर्याय असेल. 
  • सेवेदरम्यान (चार वर्षे) अग्निवीरचा मृत्यू झाल्यास त्याला विमा संरक्षण मिळेल. अशा स्थितीत कुटुंबाला सुमारे एक कोटी रुपये मिळणार आहेत.
  • याशिवाय कर्तव्यात अपंगत्व आल्याबद्दल 44 लाख रुपयांचा अनुग्रह मिळेल. यासोबतच राहिलेल्या नोकरीचा पूर्ण पगार आणि सर्व्हिस फंड पॅकेजही मिळणार आहे.
  • सर्व अग्निवीरांना एकूण 48 लाख रुपयांचा विमा दिला जाईल. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांना 44 लाख रुपये सरकारकडून एकरकमी दिले जाणार आहेत. यासोबतच सेवा निधी पॅकेजचे पूर्ण वेतन आणि उर्वरित नोकऱ्या देण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी