ही कंपनी देतेय १ लाख लोकांना नोकऱ्या,एका तासाला मिळणार इतके रूपये

जॉब पाहिजे
Updated Sep 14, 2020 | 15:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

amazon job: कंपनीला या महिन्यात सुरू होणाऱ्या १००नवी गोदामे, पॅकेज केंद्र, इतर सुविधांच्या ठिकाणी आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. 

job
कोरोना काळात ही कंपनी देतेय १ लाख लोकांना नोकऱ्या 

थोडं पण कामाचं

  • अॅमेझॉन देतेय एक लाख नोकऱ्या
  • दर तासाला मिळणार १५ डॉलर वेतन
  • कोरोनाकाळात अॅमेझॉनचा झाला खूप फायदा

मुंबई: संपूर्ण जग सध्या कोरोनाविरोधात(corona virus) लढा देत आहे. या संकटकाळात लाखो लोकांच्या नोकरीवर(job) गदा आली तर काही ठिकाणी बेरोजगारीने(jobless) वरचा स्तर गाठला. यातच अॅमेझॉन ई कॉमर्स कंपनीकडून(amazon e commerce company) मोठी बातमी समोर आली आहे. अॅमेझॉन लवकरच १ लाख लोकांना नोकरी देणार आहे. 

अमेरिका आणि कॅनडा मार्केटमध्ये अॅमेझॉनकडून एक लाख लोकांची पार्ट टाईम तसेच फुल टाईम कामासाठी भर्ती केली जाणार आहे. दरम्यान, आपले नेटवर्क विस्तारित करण्याच्या दृष्टीने अॅमेझॉनने हे पाऊल उचलले आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी अॅमेझॉनची सर्व्हिस असली पाहिजे असाही त्यामागचा हेतू आहे. 

कोरोनाच्या संकटकाळात कंपनीचा बिझनेस सातत्याने वाढत आहे. कंपनीने एप्रिल आणि जून या महिन्यांदरम्यान खूप फायदा झाला. कारण एप्रिल ते जून या काळात कोरोनामुळे अनेक लोकांनी घरातच राहून किराणा सामान ऑर्डर केले होते. कंपनीने वर्षाच्या सुरूवातीला १७५,००० लोकांना रोजगार दिला होता. कंपनीने गेल्या आठवड्यात म्हटले होते की त्यांना कॉर्पोरेट आणि तांत्रिकी विभागात नोकरीसाठी ३३,००० लोकांची गरज आहे. 

कंपनीने सोमवारी याची माहिती दिली. अॅमेझॉनने सांगितले की नवी भर्ती पार्ट टाईम तसेच फुल टाईम असेल. नवे भर्ती केले जाणारे कामगार पॅकिंग, ऑर्डर शिप करणे आणि सॉर्ट ऑर्डरची कामे करतील. यासाठी अॅमेझॉनकडून सुरूवातीला प्रति तास १५ डॉलरचे वेतन दिले जाणार आहे.

अॅमेझॉन वर्ल्डवाईड ऑपरेशनचे वरिष्ठ अधिकारी डेव क्लार्क म्हणाले,आम्ही या महिन्यात १०० नव्या बिल्डिंग्स सुरू करत आहोत. सर्व लोकांपर्यंत अॅमेझॉनची डिलीव्हरी पोहोचावी हा या मागचा उद्देश आहे. या ठिकाणी एक लाख नव्या लोकांची भर्ती केली जाणार आहे. त्यांना सुरूवातीला प्रति तास १५ डॉलर वेतन दिले जाणार आहे. दरम्यान, अॅमेझॉनकडून संपूर्ण सुरक्षिततेचे वचन पाळले जाणार आहे.  

या वर्षी अमेरिका आणि कॅनडामध्ये अॅमेझॉनने ७५ नवे सॉर्टेशन सेंट्र्स, रिजनल एअर हब्स तसेच डिलीव्हरी स्टेशन्स सुरू केलेत. २०१०पासून कंपनीने संपूर्ण अमेरिकेत तब्बल ६ लाख रोजगार निर्माण केले. तसेच ४० राज्यांमध्ये ३५० बिलियन डॉलर इतकी गुंतवणूक केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी