Agniveer Recruitment 2022 । मुंबई : केंद्र सरकार कडून वायुसेनेतील अग्निवीरांच्या भरतीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेला अग्विवीर वायु असे नाव देण्यात आले आहे. अग्निवीर वायु पदासाठी नोंदणी प्रक्रिया २४ जूनपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये पात्र असलेले उमेदवार ५ जुलै २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर अर्ज करू शकतात. तसेच हवाई दल अग्निवीरवायू नोंदणी २०२२ साठी उमेदवार वेबसाइट nairforce.cdac.in इथे देखील भेट देऊ शकतात. (Application process for recruitment of firefighters begins, know here apply process and details).
अधिक वाचा : देशात ४ महिन्यानंतर कोरोनाचे प्रथमच सापडले एवढे रूग्ण
या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराचे वय २३ वर्ष असणे गरजेचे आहे. म्हणजेच २९ डिसेंबर १९९९ आणि २९ जून २००५ दरम्यान जन्मलेले उमेदवार (दोन्ही दिवसांसह) अर्ज करण्यास पात्र आहेत.
भरतीसाठी अर्ज शुल्क २५० रूपये निश्चित करण्यात आले आहे.
विज्ञान शाखेच्या उमेदवारांना गणित आणि इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. लक्षणीय बाब म्हणजे उमेदवाराने गणित आणि इंग्रजी विषयात किमान ५०% गुण मिळवलेले असावेत.
उमेदवार कोणत्याही शाखेतून किमान ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण असावा.