Agnipath Scheme: डिसेंबरमध्ये लष्कराला मिळणार पहिला अग्निवीर; २४ जूनपासून हवाई दलात होणार भरती

जॉब पाहिजे
Updated Jun 17, 2022 | 15:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Agnipath Scheme । बिहार, यूपी आणि हरियाणामध्ये अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी आंदोलक तरूण रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान या विरोधादरम्यान भारत सरकारने गुरुवारी उच्च वयोमर्यादा २३ वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे.

army will get its first agniveer in December, Recruitment in Air Force will start from June 24
डिसेंबरमध्ये लष्कराला मिळणार पहिला अग्निवीर, हवाई दलात भरती   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • डिसेंबरमध्ये लष्कराला मिळणार पहिला अग्निवीर.
  • २४ जूनपासून हवाई दलात होणार भरती.
  • पुढील २ दिवसांत http://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अधिसूचना जारी होणार.

Agnipath Scheme । नवी दिल्ली : बिहार, यूपी आणि हरियाणामध्ये अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी आंदोलक तरूण रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान या विरोधादरम्यान भारत सरकारने गुरुवारी उच्च वयोमर्यादा २३ वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात लष्करप्रमुखांनी सांगितले की, सरकारच्या सूचनेनुसार अग्निपथ योजनेंतर्गत २०२२ च्या भरतीसाठी प्रवेशाचे वय २३ वर्षे करण्यासाठी एक वेळची सवलत दिली जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे पुढील २ दिवसांत http://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर आमची सैन्य भरती संस्था नोंदणी आणि रॅलीचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करतील. (army will get its first agniveer in December, Recruitment in Air Force will start from June 24). 

 अधिक वाचा : ५० घोडे आणि १ हजार माणसांना मागे टाकत जिंकली ३५ किमीची शर्यत

 २४ जूनपासून हवाई दलात होणार भरती

दरम्यान, या निर्णयामुळे त्या सर्व देशभक्त तरूणांना संधी मिळणार आहे, जे कोरोना महासाथी असूनही भरतीची तयारी करत होते, जी कोविडच्या निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांत होऊ शकली नाही. भरतीच्या कार्यक्रमाची लवकरच घोषणा केली जाईल. मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी भारतीय सैन्यात अग्निवीर बनण्याच्या या संधीत सामील व्हा. असे लष्कर प्रमुखांनी अधिक म्हटले. याशिवाय भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणाले की, सरकारच्या इच्छेनुसार, उच्च वयोमर्यादा २३ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, २४ जूनपासून भरतीची प्रक्रिया सुरू होईल.

घोषणेनुसार काय आहे अग्निपथ योजना?

  1. भारतीय लष्करात प्रथमच अशी योजना सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये अल्पावधीसाठी सैनिकांची भरती केली जाणार आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी सुमारे ४०-४५ हजार तरुणांना सैन्यात भरती केले जाईल. या तरुणांचे वय १७ ते २१ वर्षे वयोगटातील असेल.
  2. ही भरती गुणवत्ता आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल.
  3. या चार वर्षांत सैनिकांना ६ महिन्यांचे मूलभूत लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  4. २०-४० हजार मासिक पगारासह इतर फायदेही दिले जातील.
  5. पहिल्या वर्षी ३० हजार, दुसऱ्या वर्षी ३३ हजार, तिसऱ्या वर्षी ३६,५०० आणि चौथ्या वर्षी ४० हजार रुपयांची पगार दिला जाईल. 
  6. चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर या सर्व अग्निवीरांची सेवा संपुष्टात येईल आणि त्यानंतर नव्याने भरती करण्यात येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी