Opportunity in Aurangabad : औरंगाबादमध्ये पर्यटन व्यवसायात व्हा ‘गाईड’

Aurangabad Tourist Guide : औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटन संचालनालयाने तरूणांना ‘गाईड’ होण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

Aurangabad Tourist Guide
औरंगाबादमध्ये पर्यटन व्यवसायात व्हा ‘गाईड’ 
थोडं पण कामाचं
  • औरंगाबादमध्ये पर्यटन व्यवसायात व्हा ‘गाईड’
  • पर्यटन संचालनालयाने तरूणांना ‘गाईड’ होण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे
  • ३१ डिसेंबरपूर्वी अर्ज करावा आणि नोंदणीकृत गाईड होऊन पर्यटन क्षेत्रातील नामांकित, अभ्यासू गाईड बनावे

Aurangabad Tourist Guide : औरंगाबाद : औरंगाबाद ५२ दरवाजांचे शहर. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा लाभलेलं आंतरराष्ट्रीय पातळीवरील लौकिकप्राप्त असं औरंगाबाद. अजिंठा, वेरूळ लेण्या, बिबी – का- मकबरा, पानचक्की, दौलताबाद किल्ला आदींमुळे देशी-विदेशी पर्यटक औरंगाबादेत दाखल होतात. इथल्या वास्तूकलांचा, इतिहासाचा अभ्यास करतात. संशोधन करतात. परंतु या सर्वांमध्ये महत्त्वाची अशी भूमिका बजावतात ते गाईड. या टुरिस्ट गाईड व्यवसायात करिअर करण्याची संधी पर्यटन संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. 

Shirdi Sai Baba :  शिर्डीत रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत साई मंदिर बंद, नाईट कर्फ्यूमुळे संस्थानचा निर्णय

औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटन संचालनालयाने तरूणांना ‘गाईड’ होण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. इच्छुकांनी  https://www.maharashtratourism.gov.in/web/mh-tourism/certified-guide-training या लिंकवरून ३१ डिसेंबरपूर्वी अर्ज करावा आणि नोंदणीकृत गाईड होऊन पर्यटन क्षेत्रातील नामांकित, अभ्यासू गाईड बनावे.

गाईड होण्यासाठी अठरा ते चाळीस  वय, बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. चाळीस वयाखालील इच्छुकांसाठी किमान बारावी, चाळीसवरील इच्छुकांसाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  शारीरिकदृष्ट्या सक्षम, इतिहास, संस्कृती आणि पर्यटनाबाबत उत्साही असल्यासच या व्यवसायाकडे वळा. पर्यटकांसोबत उत्तम संवाद साधण्यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर कोणत्याही प्रादेशिक भाषेचे ज्ञान असायलाच हवे. प्रशिक्षण कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पर्यटन संचालनालयाकडून प्रमाणपत्र व पुढे टूर गाईडमधून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येते. अशाप्रकारे ‘टुरिस्ट गाईड’ व्यवसायात पर्यटकांची सेवा आणि समाधानातून रोजगारप्राप्ती करता येते. त्यामुळे इच्छुकांनी या व्यवसायाकडे संधी म्हणून बघितल्यास पर्यटन व्यवसायात वाढ होण्यास मदतच होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी