बारवी प्रकल्पबाधितांपैकी 'इतक्या' जणांना एमआयडीसीकडून नोकरी

बारवी धरणात बाधित झालेल्या 208 जणांना नोकरी देण्याची प्रक्रिया महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आजपासून सुरू केली असून पहिल्या टप्प्यात सहा जणांना नोकरीचे नियुक्तपत्र प्रदान करण्यात आले.

barvi project effected 208 get job in MIDC
बारवी प्रकल्पबाधितांपैकी 'इतक्या' जणांना एमआयडीसीकडून नोकरी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  •  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान
  • बारवी धरणात बाधित झालेल्या 208 जणांना नोकरी देण्याची प्रक्रिया
  • पहिल्या टप्प्यात सहा जणांना नोकरीचे नियुक्तपत्र प्रदान करण्यात आले.

मुंबई : बारवी धरणात बाधित झालेल्या 208 जणांना नोकरी देण्याची प्रक्रिया महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आजपासून सुरू केली असून पहिल्या टप्प्यात सहा जणांना नोकरीचे नियुक्तपत्र प्रदान करण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री आतिथीगृह येथे हा सोहळा पार पडला. यावेळी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार किसन कथोरे, एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.

बारवी धरणाच्या अतिरिक्त साठा पाणी वापर करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या पाणी वापराप्रमाणे प्रकल्पबाधितांना नोकरीमध्ये सामावून घेणेबाबत शासनाच्या निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमआयडीसी-३२९, ठाणे महानगरपालिका-२३९, मिरा-भाईंदर-१७९, कल्याण डोंबिवली महानगरपालिका-१५५, नवी मुंबई महानगरपालिका- ६०, उल्हासनगर पालिका -११९, अंबरनाथ नगरपरिषद -७१ व म्हाडा-५२ असे एकूण १२०४ प्रकल्पबाधितांना नोकरी जाणार दिली आहे.

महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळाने २४२ पात्र उमेदवारांची यादी तयार केली आहे. त्यापैकी २०८ प्रकल्पबाधितांना नोकरीचे नियुक्तीपत्र दिले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून  आज सहा जणांना नोकरीची नियुक्त पत्रे देण्यात आली. त्यांची नावे पुढील प्रमाणे.

१) ज्योत्सना लक्ष्मण पवार(कनिष्ठ अभियंता, स्थापत्य)

२)दिलीप जयवंत भोईर (तांत्रिक सहाय्यक)

३)शितल दिपक भोईर(लिपिक टंकलेखक)

४)नरेश तानाजी भोईर (वाहनचालक)

५)रमेश धाको कडाली(मदतनीस)

६)कैलास गोपाळ भवर(शिपाई)

एमआयडीसीच्या बारवीधरण प्रकल्प योजनेत पहिल्या व दुसऱ्या टप्प्याअंतर्गत एकूण १२ गावे बाधित झाली आहेत. पहिला टप्पा सन १९७२ व दुसरा टप्पा सन १९८६ मध्ये रावविण्यात आला. तथापि  पाणी साठा वाढविण्यासाठी धरणाची उंची वाढविण्यासाठी तिसरा टप्पा हाती घेण्यात आला. या टप्प्यात ६ गावे व ५ संलग्न पाडे विस्थापीत झाली आहेत. या विस्थापितांचे पुनर्वसनाचे काम एमआयडीसीमार्फत करण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी