BMC Recruitment 2023: मुंबई मनपात नोकरीची संधी; आजच करा अर्ज, जाणून घ्या कोणत्या पदासाठी आणि कसा करायचा अर्ज

BMC Recruitment updates: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई मनपात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होत आहे. 

BMC Recruitment 2023
BMC Recruitment 2023  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबई महानगरपालिकेत भरती
  • भरती प्रक्रियेसाठी टायपिंग येणे आवश्यक
  • जाणून घ्या भरती प्रक्रिया कशा प्रकारे होणार आणि अर्ज करण्याची पद्धत काय? 

Mumbai Municipal Corporation Bharati 2023 updates: मुंबई महानगरपालिकेत नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबई मनपात भरती प्रक्रिया होत आहे. जाणून घ्या कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे, पदसंख्या किती, पगार किती, शैक्षणिक अर्हता काय आणि अर्ज कसा करायचा.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) आणि कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी) या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 

पदाचे नाव - कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) 

पदांची संख्या - 9 

पदाचे नाव - कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी)

पदांची संख्या - 18

हे पण वाचा : हे संकेत दिसल्यास समजून जा तुमची किडनी खराब झालीय

शैक्षणिक अर्हता आणि इतर अर्हता

कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) 

उमेदवार माध्यमिक शालान्त परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.

उमेदवाराने शालान्त किंवा तत्सम परीक्षेत प्रत्येक 100 गुणांचे मराठी आणि इंग्रजी हे विषय घेतलेले असावेत.

इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट या गतीची शासकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्क आहे. सदर पदावर निवड झालेल्या उमेदवाराने नियुक्तीच्या दिनांकापासू दोन वर्षांच्या आत मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि

मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनट ह्या गतीची शासकीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तांत्रिक शिक्षण मंडळाचा MSCIT परीक्षा प्रमाणपत्रधाक असावा.

हे पण वाचा : तुम्हाला सुद्धा नखे चावण्याची सवय आहे का? मग हे वाचाच

कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी)

उमेदवार माध्यमिक शालान्त परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.

उमेदवाराने शालान्त किंवा तत्सम परीक्षेत प्रत्येक 100 गुणांचे मराठी आणि इंग्रजी हे विषय घेतलेले असावेत.

मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट या गतीची शासकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्क आहे. सदर पदावर निवड झालेल्या उमेदवाराने नियुक्तीच्या दिनांकापासू दोन वर्षांच्या आत इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनट ह्या गतीची शासकीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तांत्रिक शिक्षण मंडळाचा MSCIT परीक्षा प्रमाणपत्रधाक असावा.

हे पण वाचा : बिनधास्त खा पिस्ता, आरोग्याची मिटेल चिंता

वयोमर्यादा

खुल्या प्रवर्गातील उमेदवार - 18 ते 38 वर्षे

मागासवर्गीय उमेदवारांसाठी - 18 ते 43 वर्षे

हे पण वाचा : हे घरगुती उपाय करा अन् मानदुखीपासून आराम मिळवा

अर्ज सादर करण्याची पद्धत

विहित अर्हता धारण करणाऱ्या आणि अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज बंद लिफाफ्यामध्ये, लिफाफ्यावर स्वत:चे संपूर्ण नाव आणि पत्ता, अर्ज केलेल्या पदाचे नाव ठळक अक्षरात लिहून रेखांकित करुन गुरुवार, 09 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत महानगरपालिका सचिव यांच्या कार्यालय खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई - 400 001 या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रांच्या छायांकित साक्षांकित प्रतींसह टपालाद्वारे पाठवावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी