बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती

Bob Recruitment 2022 Specialist Officer Post Vacant In Bank Of Baroda Graduate Can Apply : बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda, BOB) मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरची (Specialist Officer) पदे (BOB SO Recruitment 2022) भरण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन आले आहे.

Bob Recruitment 2022
बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती
  • अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन आले
  • अर्जप्रक्रिया १२ जुलै २०२२ सुरू आहे

Bob Recruitment 2022 Specialist Officer Post Vacant In Bank Of Baroda Graduate Can Apply : बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda, BOB) मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरची (Specialist Officer) पदे (BOB SO Recruitment 2022) भरण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन आले आहे. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्जप्रक्रिया (BOB SO Recruitment 2022) २२ जूनपासून सुरू झाली आहे. एकूण ३२५ पदे भरली जातील. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०२२ आहे.

रिक्त जागांची माहिती

रिलेशनशिप मॅनेजर- ७५ पदे
कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट- १०० पदे
क्रेडिट विश्लेषक- १०० पदे
कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट- ५० पदे

पात्रता 

रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात. उमेदवाराने फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा (किमान १ वर्षाचा अभ्यासक्रम) केलेला असावा. या पदासाठी उमेदवाराचे वय २५ ते ४२ वर्षादरम्यान असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४८ हजार १७० ते ६९ हजार १८० रुपये पगार दिला जाणार आहे.

क्रेडिट विश्लेषक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. किंवा उमेदवाराकडे वित्त किंवा CA/CMA/CS/CFA या विषयातील विशेषीकरणासह पदव्युत्तर पदवी असावी. या पदासाठी उमेदवाराचे वय २८ ते ३५ वर्षांदरम्यान असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६३ हजार ८४० ते ७८ हजार २३० रुपये पगार दिला जाणार आहे.

कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि सीए असावा. या पदासाठी उमेदवाराचे वय २५ ते ३० वर्षांदरम्यान असावे. ७६ हजार ते ८९ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

अनुसूचित जाती/जमाती/अपंग व्यक्ती (पीडब्ल्यूडी)/ महिला उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क तर सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी