Bombay High Court Recruitment 2023: मुंबई हायकोर्टात विविध पदांसाठी भरती, शिक्षण केवळ 7वी पास अन् पगार 47 हजारापर्यंत  

Recruitment in Bombay High Court: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने विविध रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.

Bombay High Court Recruitment 2023 apply online for various post read education qualification salary and other details bombayhighcourt nic in
Bombay High Court Recruitment 2023: मुंबई हायकोर्टात विविध पदांसाठी भरती, शिक्षण केवळ 7वी पास अन् पगार 47 हजारापर्यंत  
थोडं पण कामाचं
  • नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
  • मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती
  • आजच करा अर्ज

Bombay High Court Recruitment notification pdf file: उच्च न्यायालय मुंबई, मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी आणि प्रतिक्षा यादी दोन वर्षांसाठी तयार करण्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

पदाचे नाव - शिपाई / हमाल

एकूण रिक्त पदे - 133
सद्य स्थितीत रिक्त असणारी पदे - 24 
पुढील दोन वर्षांत रिक्त होणारी पदे - 109

नियमाप्रमाणे शिपाई / हमाल या पदाची वेतन मॅट्रिक्स
एस - 1 (रुपये 15,000 - रुपये 47,600 व नियमाप्रमाणे भत्ते)

हे पण वाचा : दगाबाज रे.... या कारणांमुळे पार्टनरला फसवतात मुलं-मुली

पात्रता

  1. उमेदवार कमी कमी सातवी पास असावा
  2. जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे राहील. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही.

हे पण वाचा : गरोदर असताना उपवास करावा की नाही?

पात्र उमेदवाराकरीता अटी

  1. तो / ती करार करण्यास सक्षम असावा / असावी
  2. त्याला / तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला / तिला कोणत्याही न्यायालय / एम. पी. एस. सी. / यू. पी. एस. सी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीत उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे. 
  3. त्याला / तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या / तिच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा.
  4. महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम, 2005 नुसार, उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास, 28 मार्च 2006 व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.

हे पण वाचा : या पत्त्यावर तिसरा 8 अंक तुम्हाला दिसला का? शोधा बरं

How to apply for recruitment of Bombay High Court various posts अर्ज करण्याची पद्धत

अर्ज सादर करताना https ://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करुनच अर्ज सादर करावा. 

ऑनलाईन अर्ज जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून 15 दिवसात करावा. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. 

पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज https ://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटद्वारे दिनांक 24 मार्च 2023 ते दिनांक 7 एप्रिल 2023 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक 24 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता सुरू झाली आणि दिनांक 7 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजता बंद होईल.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवाराने स्वत:चा अद्यावत पासपोर्ट साईज फोटो (3.5 सेमी. X 4.5 सेमी) व स्वत:ची स्वाक्षरी (3 सेमी X 2.5 सेमी) स्कॅन करुन 40 kb पेक्षा कमी आकाराच्या दोन स्वतंत्र फाईल्स jpg / jpeg format मध्ये करुन ऑनलाईन अर्जात दर्शवलेल्या ठिकाणी सदर फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे अनिवार्य आहे. 

उमेदवाराने https ://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर क्लिक करुन Recruitment मध्ये Peon / Hamal च्या Apply Online वर क्लिक करावे. त्यानंतर  SBI Collect द्वारे ऑनलाईन फी भरावी. नंतर SBI Collect Reference No. प्राप्त होईल आणि मग ऑनलाईन फॉर्म भरावा. 
उमेदवाराने आपली सर्व माहिती योग्यरित्या भरून झाल्यावर सर्वात शेवटी I Agree बटणावर क्लिक करुन अर्ज सादर करावा.

या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील संपूर्ण जाहिरात आणि पीडीएफ नोटिफिकेशन पाहण्यासाठी https://bombayhighcourt.nic.in/writereaddata/recruitment/PDF/recruitbom20230324102020.pdf या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी