सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर !, इंग्रजी, हिंदीसह मराठीतूनही CAPF ची परीक्षा देता येणार

CAPFconstable recruitment : केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय निमलष्करी दलात भरतीसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे.

crpf constable recruitment exam held in 13 regional languages
सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर !, इंग्रजी, हिंदीसह मराठीतूनही CAPF ची परीक्षा देता येणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय निमलष्करी दलात भरतीसाठी 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा देता येणार
  • केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय
  • लाखो उमेदवारांना त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेत परीक्षेत भाग घेता येणार

CAPFrecruitment 2023 : केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय निमलष्करी दलात (CAPF) भरतीसाठी हिंदी, इंग्रजीसह मराठी आणि इतर १२ प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा देण्यास मान्यता दिली आहे.(CAPF constable recruitment exam held in 13 regional languages)

अधिक वाचा : RBI ने कर्जदारांना दिला मोठा दिलासा, EMI चुकवल्यास द्यावा लागणार नाही दंड

CRPF मध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. आता CRPF भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी भाषेत देता येणार आहे. 

अधिक वाचा : Credit Card Shopping: खरेदी करताना क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय आहे? जाणून घ्या फायदे आणि तोटे

गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेतून परीक्षेत भाग घेता येणार आहे. त्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढणार आहे. कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे आयोजित प्रमुख परीक्षांपैकी एक आहे. ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार भाग घेतात. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, 1 जानेवारी 2024 पासून 13 प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी