Central Bank of India Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती, Apply Online

जॉब पाहिजे
Updated Mar 21, 2023 | 14:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

CBI Bharti 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिस (शिकाऊ) पदासाठी बंपर भरतीची जाहिरात काढली आहे. तब्बल 5000 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छूक आहेत, त्यांनी अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करावेत.

central bank of india Job
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भर्ती 2023  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भर्ती 2023
  • या पदासाठी फक्त ऑनलाइन अर्ज
  • 20 ते 28 वयोगटातील उमेदवार या पदासाठी पात्र

Central Bank of India: सेंट्रल बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिस (शिकाऊ) पदासाठी बंपर भरतीची जाहिरात काढली आहे. तब्बल 5000 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करावेत. 20 मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 एप्रिल 2023 आहे. 

कोण अर्ज करू शकतो? 

पदवीधर तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची ही उत्तम संधी आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसंच 20 ते 28 वयोगटातील उमेदवार या पदासाठी पात्र असणार आहेत. 

अधिक वाचा:  Gold Rate Today : 60 हजारांवर पोहोचले सोने, सराफा बाजारात विक्रमी तेजी

फी किती भरावी लागेल? 

अपंग उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 400 रुपये शुल्क भरावं लागणार आहेत. याशिवाय SC, ST आणि महिला उमेदवारांना अर्जासाठी 600 रुपये भरावे लागणार आहेत. इतर सर्व उमेदवारांना अर्जासाठी 800 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. 

अधिक वाचा: Importance of Buying Gold on Gudi Padwa: गुढीपाडव्याच्या दिवशी 'गजकेसरी योग', जाणून घ्या या काळात सोने खरेदीचा शुभ मुहूर्त

किती वेतन मिळेल? 

देशभरातील विविध राज्यात ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवार ज्या शाखेत निवडला जाईल त्यानुसार त्याला वेतन मिळणार आहे. उदाहरणार्थ, ग्रामीण आणि निमशहरी शाखेसाठी 10,000 रुपये वेतन असणार आहे. तर शहरी शाखेसाठी 15,000 रुपये वेतन निश्चित करण्यात आलं आहे. मेट्रो शहरातील शाखेसाठी दरमहा 20,000 रुपये वेतन असणार आहे. 

अधिक वाचा: Goat Farming: 90% अनुदानासह सुरू करा शेळीपालन व्यवसाय, घरबसल्या कमवा लाखो रुपये

असा करा अर्ज 

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अप्रेंटिस पदासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना यासाठी centralbankofindia.co.in या सेंट्रल बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असेल. याबद्दलचे आणखी अपडेट्स मिळविण्यासाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट तपासत रहा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी