BSF Constable Recruitment 2023: सरकारी नोकरी करू पाहणाऱ्या तरूणांसाठी सुवर्णसंधी आहे. सीमा सुरक्षा दलाने कॉन्स्टेबल पदासाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार BSF मध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी अधिकृत वेबसाइटवर निर्धारित वेळेत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफमध्ये कॉन्स्टेबलच्या 1410 पदांसाठी भरती होणार आहे. यापैकी 67 पदे महिलांसाठी राखीव आहेत. तसेच पुरुषांसाठी 1343 पदे आहेत. दहावी पास असलेले भरतीसाठी अर्ज करू शकतील. निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
बीएसएफच्या कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी किमान वय हे 18 असायला हवे तर कमाल वय हे 25 असायला हवे. मात्र सरकारच्या काही नियमांनुसार आरक्षित वर्गाच्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. याशिवाय, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
सगळ्यात आधी rectt.bsf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा
होम पेजवर कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या अॅप्लिकेशन लिंकवर क्लिक करा
तुमच्यासमोर एक नवीन पेज येईल, आणि दिलेली सर्व माहिती भरून घ्या आणि सबमिटवर क्लिक करा. नंतर आवश्यक ती सर्व कागदपत्रकं अपलोड करून अर्ज फी जमा करा.
कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी निवड लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल. परीक्षेची तारीख कळवली जाईल. परीक्षेसाठी लागणाऱ्या अॅडमिट कार्डबाबत लवकरच अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली जाईल.