CTET Admit Card 2021 Update: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे अॅडमिट कार्ड येणार कधी? जाणून घ्या

Central Teacher Eligibility Test 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (CBSE) घेण्यात येणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ (Central Teacher Eligibility Test 2021) (CTET परीक्षा २०२१) चे प्रवेशपत्र (CTET Admit Card 2021)  प्रवेशपत्र (Admit Card )जारी करण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.

CTET Admit Card 2021 Update
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२१चं Admit Card मिळालं का?  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे अॅडमिट कार्ड
  • परीक्षेचे आयोजन १६ डिसेंबर २०२१ पासून १३ जानेवारी २०२२ या कालावधीत
  • प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर प्रसिद्ध केले जाणार

Central Teacher Eligibility Test 2021: नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात (Central Board of Secondary Education) शिक्षकाची नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज भरला असेल तर त्यांना प्रवेश कार्डाची प्रतिक्षा असेल. याच कार्डविषयची नवी अपडेट या बातमीमध्ये देण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (CBSE) घेण्यात येणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ (Central Teacher Eligibility Test 2021) (CTET परीक्षा २०२१) चे प्रवेशपत्र (CTET Admit Card 2021)  प्रवेशपत्र (Admit Card )जारी करण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसारच याचा अंदाज लावला जात आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर प्रसिद्ध केले जाणार आहे.

दरम्यान, सीटीईटी परीक्षेचे आयोजन १६ डिसेंबर २०२१ पासून १३ जानेवारी २०२२ या कालावधीत होणार आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. परीक्षा सुरू होण्याच्या किमान दोन आठवडे आधी अॅडमिट कार्ड जारी केले जाते. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, परीक्षा सुरू होण्यासाठी आणखी १० दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत ६ डिसेंबरला परीक्षचे प्रवेशपत्र जारी होण्याची शक्यता होती.केंद्रीय स्तरावर आयोजित केल्या जाणार्‍या CTET 2021 या परीक्षेसाठी देशभरातील ३०० हून अधिक शहरांमध्ये परीक्षा केंद्रे उपलब्ध केली जाणार आहेत. CTET 2021 साठी अर्ज प्रक्रिया १९ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली होती आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०२१ होती.

इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांचा शिक्षक होण्यासाठी उमेदवारांना पेपर १ द्यावा लागेल, इयत्ता पहिली ते आठवीसाठी पेपर २ ची परीक्षा द्यावी लागेल. दोन्ही पेपरमध्ये १५० गुणांचे १५० प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी १५० मिनिटांचा असेल आणि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी