CTET Result 2023 Declare Date : CTET निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा (CTET) निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. तुम्हीही ही परीक्षा दिली असेल तर तुम्ही तुमचा निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता. याशिवाय निकालाची थेट लिंकही येथे उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अधिक वाचा : Valentine डेला असं व्यक्त करा आपलं प्रेम, नक्कीच उत्तर येईल हो
CTET डिसेंबरची परीक्षा 28 डिसेंबर ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घेण्यात आली. परीक्षा सकाळी 9:30 ते दुपारी 12 आणि दुपारी 2:30 ते 5 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. ही परीक्षा देणारे उमेदवार आता आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. निकालापूर्वी बोर्ड परीक्षेची प्राथमिक उत्तरपत्रिका जारी केली आहे. ज्यावर प्राप्त आक्षेप निकाली काढल्यानंतर अंतिम आंसर की आणि निकाल जाहीर केला जाईल.
अधिक वाचा : तुमच्या प्रेमाला या सुंदर वॉलपेपरसह पाठवा खास massage
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीटीईटी परीक्षेचा निकाल मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.तर, उत्तर की (आंसर की ) फेब्रुवारीच्या अखेरीस प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, या संदर्भात सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. CTET डिसेंबरच्या निकालावरील अपडेट्स प्रथम येथे जाहीर केले जाणार आहे.
अधिक वाचा : अरे देवा ! सततच्या धावपळीमुळे CM शिंदे साहेबांचं घटलं वजन
सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट द्या.
त्यानंतर CTET डिसेंबर निकाल 2023 च्या लिंकवर क्लिक करा.
आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. मागितलेली सर्व माहिती येथे प्रविष्ट करा.
उमेदवार CTET निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
सीटीईटी पेपर 1 हा वर्ग 1 ते 5 व वर्ग 6 ते 8 वी वर्गासाठी पेपर 2 ची परीक्षा घेतली जाते. या वर्गाच्या शिक्षक पदांसाठी हे पेपर घेतले जातात. यावर्षी सुमारे 32.45 लाख उमेदवार CTET परीक्षेला बसले होते. ज्याचे निकाल लवकरच जाहीर होतील.