बँकेत नोकरीची सुवर्ण संधी; IBPS तर्फे तब्बल 8106 जागांसाठी मेगाभरती जाहीर; त्वरीत करा अर्ज

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IBPS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. गट “अ” अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट “ब” कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 असणार आहे.

Mega recruitment for 8106 posts by IBPS
IBPS तर्फे तब्बल 8106 जागांसाठी मेगाभरती   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 असणार
  • गट “अ” अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट “ब” कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय). या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
  • खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा फी 850 रुपये तर SC/ST/PWBD प्रवर्गासाठी फक्त 175 रुपये आहे.

मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IBPS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. गट “अ” अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट “ब” कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती
कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय)
ऑफिसर स्केल-I
ऑफिसर स्केल II (कृषी अधिकारी)
ऑफिसर स्केल II (मार्केटिंग ऑफिसर)
ऑफिसर स्केल II (ट्रेझरी मॅनेजर)
ऑफिसर स्केल II (कायदा)
ऑफिसर स्केल II (CA)
ऑफिसर स्केल II (IT)
Officer Scale II (General Banking Officer)
Officer Scale III
एकूण जागा - 8106 (महाराष्ट्रात जागा - 621)

पदांसाठी काय लागेल शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय) -

उमेदवारांकडे कोणत्याही विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

ऑफिसर स्केल-I
ऑफिसर स्केल II (कृषी अधिकारी) -

उमेदवारांकडे कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.


ऑफिसर स्केल II (मार्केटिंग ऑफिसर) -

उमेदवारांकडे कृषी विपणन आणि सहकार, विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

ऑफिसर स्केल II (ट्रेझरी मॅनेजर) -

उमेदवारांकडे माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

ऑफिसर स्केल II (कायदा) -

उमेदवारांकडे कायदा विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

ऑफिसर स्केल II (CA) -

उमेदवारांकडे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया कडून प्रमाणित सहयोगी (CA) पदवी असणं आवश्यक आहे.

ऑफिसर स्केल II (IT) -

उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

Officer Scale II (General Banking Officer) -

उमेदवारांकडे बॅचलर डिग्री. बँकिंग, वित्त, विपणन, कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, विषयांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

Officer Scale III -

उमेदवारांकडे diploma in Banking, Finance, Marketing, Agriculture आणि बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.

परीक्षा भरती शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी - 850/- रुपये
SC/ST/PWBD प्रवर्गासाठी - 175/- रुपये

आवश्यक कागदपत्रे 

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 27 जून 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी 
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.ibps.in/ या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी