Govt Jobs News : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, १० लाख पदांवर होणार भरती

Govt Jobs News : भारतात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. देशात वेगवेगळ्या १० लाख पदांवर सरकारी नोकरीसाठी भरती होणार आहे.

Golden opportunity for government jobs recruitment for 10 lakh posts
Govt Jobs News : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, १० लाख पदांवर होणार भरती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Govt Jobs News : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, १० लाख पदांवर होणार भरती
  • मार्च २०२१ च्या आकडेवारीनुसार देशात ९.७९ लाख सरकारी नोकरीची पदे रिक्त
  • लवकरच रिक्त पदांना भरण्यासाठी नियमानुसार प्रक्रिया सुरू होणार

Govt Jobs News : भारतात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. देशात वेगवेगळ्या १० लाख पदांवर सरकारी नोकरीसाठी भरती होणार आहे. लवकरच ही भरती सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय कार्मिक राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिली. 

Mirachi Upay : नोकरी मिळत नाही ? लाल मिरचीचा करा उपाय आणि मिळेल यश

मार्च २०२१ च्या आकडेवारीनुसार देशात ९.७९ लाख सरकारी नोकरीची पदे रिक्त आहेत. लवकरच रिक्त पदांना भरण्यासाठी नियमानुसार प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय कार्मिक राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिली.

सरकारचे प्रशासकीय काम करण्यासाठी देशात ४० लाख ३५ हजार २०३ पदे आहेत. यापैकी ९.७९ लाख पदे रिक्त आहेत. ३० लाख ५५ हजार ८७६ पदांवर अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. ही माहिती केंद्रीय कार्मिक राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिली.

आज देशाला मिळणार नवे राष्ट्रपती, लवकरच जाहीर होणार निकाल

रिक्त पदे आणि भरतीची प्रक्रिया

निधन, निवृत्ती, स्वेच्छा निवृत्ती, राजीनामा, बढती, बदली यामुळे सरकारी पातळीवर पदे रिक्त होतात. काही वेळा नव्याने तयार केलेल्या पदासाठी सक्षम व्यक्तीची निवड झाली नसल्यामुळेही पदे रिक्त असतात. सध्या वेगवेगळ्या कारणामुळे सरकारचे प्रशासकीय काम करण्यासाठी देशात ९.७९ लाख पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होत असल्याचे केंद्रीय कार्मिक राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले.

रिक्त पदांवर लवकरच होणार भरती

सरकारी पातळीवर रिक्त असलेली पदे भरण्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल. नियमांनुसार भरती होईल. भरतीसाठी जाहिराती देऊन पात्रतेच्या अटी आणि अर्ज करण्याची मुदत याबाबतची घोषणा केली जाईल. अर्ज आल्यानंतर परीक्षा मुलाखत अशा पद्धतीने नियमानुसार भरती होईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले निर्देश

सरकारी पातळीवर रिक्त असलेली पदे भरण्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. ही माहिती केंद्रीय कार्मिक राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.

केंद्र सरकारच्या प्रशासनात कार्यरत ३० लाख ८७ हजार २७८ कर्मचाऱ्यांपैकी ३ लाख ३७ हजार ४३९ महिला कर्मचारी आहेत. भरती प्रक्रिया करताना पात्र उमेदवारांना संधी दिली जाईल. या भरती प्रक्रियेमुळे सरकारी सेवेतील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संख्येत वाढ होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी