नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; 'या' चार मोठ्या कंपन्या देणार 1 लाख नोकऱ्या, तयार ठेवा कागदपत्रे

जॉब पाहिजे
Updated Apr 19, 2021 | 14:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

इन्फोसिस, विप्रो, टीसीएस आणि एचसीएल या देशातल्या चार मोठ्या आणि महत्वाच्या कंपन्या यावर्षी साधारण एक लाख आयटी प्रोफेशनल तयार करण्याची योजना तयार करत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळतील.

Jobs
नोकऱ्यांबद्दल आली चांगली बातमी, या चार मोठ्या कंपन्या देणार 1 लाख नोकऱ्या, तयार ठेवा कागदपत्रे  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • सॉफ्टवेअर सेवांची मागणी झाली आधीपेक्षा दुप्पट
  • टीसीएस देणार 40 हजार नवीन लोकांना नोकऱ्या
  • विप्रोनेही केली नोकऱ्या देण्याची अधिकृत घोषणा

नवी दिल्ली :  कोरोनाच्या संकटामुळे (Corona pandemic) देशात बेरोजगारीचे (job loss) प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेक लोकांना लॉकडाऊन (lockdown), नवे निर्बंध (restrictions) आणि संसर्गाच्या (infection) धोक्यामुळे आपल्या नोकऱ्या (jobs) गमवाव्या लागल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्थाही (economy) संघर्ष करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत देशातील चार महत्वाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (information technology) कंपन्या (companies) यावर्षी मोठ्या प्रमाणात आयटी प्रोफेशनल (IT professionals) तयार करण्याच्या तयारीत आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर देशात नोकरीच्या नव्या संधी (new job opportunities) उपलब्ध होणार आहेत.

सॉफ्टवेअर सेवांची मागणी झाली आधीपेक्षा दुप्पट

इन्फोसिस, विप्रो, टीसीएस आणि एचसीएल या देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या महत्वाच्या कंपन्या आहेत ज्यांचे ऑपरेशन पूर्णपणे डिजिटल झाले आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर सेवांच्या मागणीमध्ये आधीच्या तुलनेत साधारण दुप्पट वाढ झाली आहे. हीच मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021-22मध्ये 45 टक्के जास्त नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

टीसीएस देणार 40 हजार नवीन लोकांना नोकऱ्या

जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या टीसीएसकडून सांगण्यात आले आहे की कंपनी आर्थिक वर्ष 2021-22मध्ये 40 हजार नव्या लोकांना नोकऱ्या देण्याच्या तयारीत आहे. यामुळे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 5 लाखांच्याही वर जाईल. इन्फोसिस ही कंपनीही या आर्थिक वर्षात 26 हजार नव्या लोकांना नोकरी देणार आहे. तर एचसीएल टेक ही कंपनी यावर्षी 12 हजार नव्या लोकांना कंपनीत घेईल.

विप्रोनेही केली नोकऱ्या देण्याची अधिकृत घोषणा

विप्रो कंपनीकडून अद्याप नोकऱ्यांची नेमकी संख्या सांगितली गेलेली नसली तरीही काही दिवसांपूर्वी विप्रो कंपनीचे मानव संसाधन अधिकारी सौरभ गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार या आर्थिक वर्षात विप्रोकडून अधिक लोकांना नोकऱ्या दिल्या जातील. गेल्या वर्षात या कंपनीने 9 हजार नव्या लोकांना नोकऱ्या दिल्या होत्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी