ESIC Recruitment 2021-22 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ESIC मध्ये नोकर भर्ती, दरमहा वेतन मिळेल 80 हजार; कसा कराल अर्ज?

ESIC Recruitment 2021-22 :सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) (Employee State Insurance Corporation) ने अधिसूचना (Notification) जारी करून विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत

Recruitment in ESIC, how to apply
ESICमध्ये 3000 हून अधिक पदांची भरती,दरमहा वेतन मिळेल 80 हजार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ESIC देशभरात 3000 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 जानेवारीपासून Employee State Insurance Corporation च्या www.esic.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ESIC Recruitment 2021-22 : नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) (Employee State Insurance Corporation) ने अधिसूचना (Notification) जारी करून विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. महामंडळाने ज्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत, त्यात अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांचा समावेश आहे. 

या भरती प्रक्रियेद्वारे, ESIC देशभरात 3000 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 जानेवारीपासून ESIC (Employee State Insurance Corporation) च्या www.esic.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे 3847 पदांवर भरती होणार आहे. उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. दरम्यान अद्याप परीक्षेची तारीख आणि वेळ सध्या जाहीर करण्यात आलेली नाही.

कधीपर्यंत करता येणार अर्ज?

  • अर्ज प्रक्रिया  : 15 जानेवारी 2022 सुरू
  • ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2022

ESIC UDC, Steno and MTS Posts : योग्‍यता काय आहे?

  • UDC : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
  • स्‍टेनोग्राफर : 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. शिवाय त्यांना टायपिंग माहित असायला हवे.
  • MTS : दहावी पास उमेदवार अर्ज करु शकतात. 

वयाची अट :

UDC आणि स्‍टेनो : 18 ते 27 वयोगटातील इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. 
MTS : 18 ते 25 वयोगटातील इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. 

काय असेल ESIC मधील वेतन :

UDC आणि स्‍टेनो : 25,500-81,100 पर्यंत (सातव्या वेतन आयोगानुसार)
MTS : 18,000-56,900 पर्यंत (सातव्या वेतन आयोगानुसार)

कसा कराल अर्ज?

सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करा. त्यानंतर अर्ज भरा आणि सेव्ह करा
तुमचा फॉर्म सत्यापित करण्यास विसरू नका आणि नंतर Save & Next बटण दाबा
परीक्षा शुल्क भरा
डॉक्युमेंट स्कॅन करा आणि अपलोड करा 

अर्जाचा शुल्क 

SC/ST/PWD/विभागातील उमेदवार, महिला उमेदवार आणि एक्स-सर्व‍िसमेन: 250/-
बाकी श्रेणी : 500/-

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी