महाराष्ट्रात सरकारी नोकरीची संधी, 378 रिक्त जागांवर होणार भरती

Govt Job Opportunity in Maharashtra, Recruitment for 378 Vacancies : सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात सरकारी नोकरीची संधी आहे.

Govt Job Opportunity in Maharashtra
महाराष्ट्रात 378 रिक्त सरकारी जागांवर होणार भरती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • महाराष्ट्रात 378 रिक्त सरकारी जागांवर होणार भरती
 • सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांकरिता आनंदाची बातमी
 • अर्ज प्रक्रिया सोमवार 3 ऑक्टोबर 2022 पासून सुरू

Govt Job Opportunity in Maharashtra, Recruitment for 378 Vacancies : सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात सरकारी नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता (महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2022) पदांच्या एकूण 378 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सोमवार 3 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख रविवार 23 ऑक्टोबर 2022 आहे. या संदर्भात सविस्तर माहिती http://mpsc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 21 हजार 403 कोटींचे GST कलेक्शन

Changes from 1st October 2022: आजपासून होणार हे 10 मोठे बदल...तुमच्यावर होणार थेट परिणाम, पाहा कोणते

 1. परीक्षा : महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2022
 2. पद (पदाचे नाव) : वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता
 3. पदसंख्या : 378
 4. शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वेबसाईटवर वाचा)
 5. नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र राज्य
 6. परीक्षा केंद्र : औरंगाबाद, अमरावती, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर
 7. अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन, सोमवार 3 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाइन अर्ज करता येणार. 
 8. अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख रविवार 23 ऑक्टोबर 2022

पदसंख्या

 1. वनक्षेत्रपाल, गट ब : 13 पदे
 2. उप संचालक, कृषि व इतर गट-अ : 49 पदे
 3. तालुका कृषी अधिकारी व इतर, गट-अ : 100 पदे
 4. कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब : 65 पदे
 5. सहायक अभियंता,स्थापत्य, गट ब, श्रेणी-2 : 102 पदे
 6. सहायक अभियंता,विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-2 : 49 पदे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी