मुंबई : भारतीय लष्करात (Indian Army) नोकरी (job) करण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. देशसेवा करण्यासाठी तरुण आर्मीमध्ये सामील होत असतात. अशाच उमेदवारांसाठी इंडियन आर्मीने बारावीची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी खूशखबर दिली आहे. भारतीय सैन्याच्या 10+2 Technical Entry Scheme (TES) - 48 अंतर्गत लवकरच नव्वद पदांसाठी भरती होणार आहे. विशेष म्हणजे ही पदभरती ही JEE Mains च्या मार्कांच्या आधारावर होणार आहे. त्यामुळे JEE Mains मध्ये चांगले मार्क्स आहेत त्यांना इंडियन आर्मीत नोकरीचा गोल्डन चान्स मिळणार आहे.
ज्या उमेदवारांना ही नोकरी मिळवायची आहे असे उमेदवार joinindianarmy.nic.in या लष्कराच्या अधिकृत साइटद्वारे अर्ज करू शकतात. 22 ऑगस्टपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे उमेदवारांना 21 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी असणार आहे. इंडियन आर्मीच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, एकूण 90 रिक्त पदं भरण्यासाठी भरती घेण्यात येत आहे, ही भरती तात्पुरती असणार आहे. तसंच या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण अकादमीमधील प्रशिक्षण क्षमतेनुसार बदलल्या जाऊ शकतात. एकदा, चार वर्षांचा हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, कॅडेट्सना लष्करात लेफ्टनंट पदासाठी कायमस्वरूपी कमिशन दिलं जाणार आहे.
Read Also : Monsoon Assembly Session : आज अधिवेशनाचा पाचवा दिवस
अर्जदारांची निवड त्यांच्या कामगिरीच्या आधारे दोन टप्प्यात केली जाईल. निवडलेल्या व्यक्तींना मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि त्यानंतर मेडिकल टेस्ट केली जाईल. “अंतिम गुणवत्ता यादी प्री-कमिशनिंग ट्रेनिंगसाठी इंडक्शन करण्यापूर्वी डायरेक्टरेट जनरल ऑफ रिक्रूटिंग वेबसाइट www.joinindianarmy.nic.in वर पब्लिश केली जाणार आहे.
Read Also : हरतालिका तीजला होतोय हा दुर्मिळ योग