HPCL Job 2023 : पदवीधरांना हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये नोकरी; निवडीसाठी नाही होणार लेखी परीक्षा

hpcl recruitment 2023 career news job in hindustan petroleum without written exam : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीत 116 पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवार अर्ज करू शकतात.

hpcl recruitment 2023 career news job in hindustan petroleum without written exam
पदवीधरांना हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये नोकरी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पदवीधरांना हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये नोकरी
  • निवडीसाठी नाही होणार लेखी परीक्षा
  • भरतीसाठी लेखी परीक्षा होणार नाही पण मुलाखत घेतली जाणार

hpcl recruitment 2023 career news job in hindustan petroleum without written exam : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीत 116 पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवार अर्ज करू शकतात. एचपीसीएलमध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस (पदवीधर शिकाऊ उमेदवार) आणि टेक्निशियन अप्रेंटिस (तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार) या पदांवर भरती होणार आहे. पदवीधर शिकाऊ उमेदवारांसाठी 86 आणि  तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवारांसाठी 30 पदांवर भरती होणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार portal.mhrdnats.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. पात्रतेबाबतची सविस्तर माहिती portal.mhrdnats.gov.in वर मिळेल. आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत आहे. 

ग्रॅज्युएट अप्रेंटिस (पदवीधर शिकाऊ उमेदवार) या पदासाठी संबंधित क्षेत्रातील इंजिनीअरिंगचे पदवीधर अर्ज करू शकतील. टेक्निशियन अप्रेंटिस (तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार) या पदासाठी संबंधित क्षेत्रातील इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केलेले उमेदवार अर्ज करू शकतील. अर्जदाराचे वय 18 ते 25 दरम्यान असणे अपेक्षित आहे.

ग्रॅज्युएट अप्रेंटिस (पदवीधर शिकाऊ उमेदवार) या पदासाठी दरमहा २५ हजार स्टायपेंड दिला जाईल. टेक्निशियन अप्रेंटिस (तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार) या पदासाठी दरमहा १५ हजार स्टायपेंड दिला जाईल. अर्जदार उमेदवारांना त्यांचा रेझ्युमे (सीव्ही), दहावी, बारावी आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रं (सर्टिफिकेट) ही डॉक्युमेंट ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करावी लागतील.

अर्जदारांनी अर्ज करण्याआधी पात्रतेचे निकष तसेच संबंधित संस्थेने दिलेल्या अटीशर्ती वाचून घ्याव्या आणि त्याचे पालन करावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल. 

Syria Earthquake : भूकंपाचा गैरफायदा घेऊन जेलमधून पळाले IS चे दहशतवादी

Numerology : आपल्या जन्मतारखेचा मूलांक 5 आहे तर नशीबवान आहात, होईल आर्थिक लाभ

भरतीसाठी लेखी परीक्षा होणार नाही पण मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखत फेब्रुवारी 2023 मध्येच होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2023 आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी