IIT Bombay विविध पदांसाठी नोकरी भरती, उमेदवाराना २५ हजार ते २ लाख रुपये पगार

IIT Bombay Recruitment : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मुंबईने कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चरल, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक आणि अधीक्षक अभियंता ही पदे भरली आहेत. यासाठी निवड झाल्यास उमेदवाराना २५ हजार ते २ लाख रुपये पगार मिळेल.

IIT Bombay Recruitment for various posts, Salary of Rs. 25,000 to 2 lakhs per candidate
IIT Bombay विविध पदांसाठी नोकरी भरती, उमेदवाराना २५ हजार ते २ लाख रुपये पगार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • IIT मुंबई विविध पदांसाठी मेगा भरती
  • इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर येतात.
  • 9 जून 2022 ही अर्ज करण्‍याची शेवटची तारीख आहे.

मुंबई : IIT मुंबई (Indian Institute of Technology Bombay) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील दिला आहे. आयआयटी मुंबई येथे ज्युनिअर इंजिनीअर सिव्हिल, ज्युनिअर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, सुप्रींटेंडींग इंजिनीअर ही वेगवेगळी पद भरणार आहेत. यासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. (IIT Bombay Recruitment for various posts, Salary of Rs. 25,000 to 2 lakhs per candidate)

अधिक वाचा : 

LIC share allotment : तुम्ही एलआयसीच्या आयपीओसाठी अर्ज केला होतो का? पाहा अर्जाची स्थिती कशी तपासायची, किती शेअर्स कधी मिळणार...

ज्युनिअर इंजिनीअर सिव्हिल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक किंवा बीई पर्यंतचे शिक्षण असणे गरजेचे आहे. तसेच ज्युनिअर इंजिनीअर सिव्हिल या पदाचा किमान अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच आयआयटी मुंबईकडून जाहीर करण्यात आलेल्या नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४४ हजार ९०० रुपये पगार दिला जाणार आहे.

अधिक वाचा : 

वाढत्या महागाईतही कंपन्यांचा मार्केटिंग फंडा, कंपन्यांनी प्रोडक्टची किंमत जैसेथै ठेवून मिळवलं प्राॅफिट

ज्युनिअर अॅडमिनिस्ट्रेटीव्ह असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून आर्ट्स, सायन्सपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच ज्युनिअर अॅडमिनिस्ट्रेटीव्ह असिस्टंट या पदाचा किमान अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच आयआयटी मुंबईकडून जाहीर करण्यात आलेल्या नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

अधिक वाचा : 

Twitter Deal: एलोन मस्कची ट्विटर डील थांबताच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

सुप्रींटेंडींग इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक/बीई पर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. सुप्रींटेंडींग इंजिनीअर या पदाचा किमान अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच आयआयटी मुंबईकडून जाहीर करण्यात आलेल्या नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख २३ हजार १०० ते २ लाख १५ हजार ९०० रुपये पगार दिला जाणार आहे.

अधिक वाचा : 

Elon Musk : ट्विटरच्या सौद्याला नवे वळण...बनावट अकाउंटची आकडेवारी समोर येईपर्यत ट्विटरची डील स्थगित, इलॉन मस्कचे धक्कादायक ट्विट

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

उमेदवारांनी आपले अर्ज ९ जून २०२२ पूर्वी पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी