India Post GDS Result 2023: अखेर प्रतीक्षा संपली, ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल फक्त एका क्लिकवर; ही लिंक पाहा

India Post GDS Result 2023 भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भर्ती निकाल 2023 जाहीर झाला आहे. 10वी परीक्षेतील गुणांच्या आधारे GDS साठी शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार

India Post GDS Result 2023 Declared how to check see here
India Post GDS Result 2023: अखेर प्रतीक्षा संपली, ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल फक्त एका क्लिकवर; ही लिंक पाहा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर
  • सर्व मंडळांच्या निकालांची थेट लिंक येथे पहा
  • इंडिया पोस्ट वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या

मुंबई : भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भर्ती निकाल 2023 जाहीर केला आहे. 10वी परीक्षेतील गुणांवर आधारित GDS साठी निवडलेल्या उमेदवारांची यादी सर्व मंडळांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी इंडिया पोस्ट GDS भर्तीसाठी अर्ज केला आहे ते इंडिया पोस्ट वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट देऊन निकाल यादीत त्यांचे नाव/रोल नंबर तपासू शकतात. (India Post GDS Result 2023 Declared how to check see here)

अधिक वाचा : सावधान... H3N2 सोबत कोरोनाचाही वाढतोय धोका; केंद्राकडून राज्यांना निर्देश

GDS पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यातील दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीची तारीख आणि वेळ नंतर जारी केली जाईल. उमेदवार येथे दिलेल्या सोप्या स्टेपमध्ये त्यांचा निकाल तपासू शकतात.

इंडिया पोस्ट GDS निकाल 2023 लिंक

इंडिया पोस्टच्या वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जा.
मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या इंडिया पोस्ट GDS निकाल 2023 या लिंकवर क्लिक करा.
आता तुमच्या स्क्रीनवर PDF फाइल उघडेल जिथे उमेदवार त्यांचे नाव तपासू शकतात.
हे पेज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

अधिक वाचा : BECIL Recruitment 2023 : दहावी, बारावी आणि पदवीधरांसाठी सरकारी कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची संधी

इंडिया पोस्ट GDS भरतीमध्ये देशभरातून एकूण 40,889 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी 28 जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून 16 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याची मुभा होती. महाराष्ट्र टपाल विभाग (Post Office Bharti 2022 Maharashtra) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण 3026 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अधिक माहितीसाठी, तुम्ही इंडिया पोस्टच्या वेबसाइटवर वेळोवेळी जारी केलेली अधिसूचना पाहू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी