Indian Army Recruitment 2023 Recruitment Of 135 Group C Posts In Indian Army, Indian Army HQ 22 Recruitment 2023 For 135 Group C Posts : लष्करी सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्यांसाठी सुवर्णसंधी. भारतीय सैन्याच्या ग्रुप सी पदांसाठी भरती सुरू आहे. भारतीय लष्कराच्या मुख्यालय २२ अंतर्गत ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. । जॉब पाहिजे
भारतीय लष्कराच्या मुख्यालय २२ अंतर्गत ग्रुप सी पदावर 135 जणांची भरती होणार आहे. एमटीएस (सफाईवाला), एमटीएस (मेसेंजर), मेस वेटर, बार्बर, वॉशरमन, मशालची आणि कुक अशी ही पदे आहेत. निवड झालेल्यांना वेतनश्रेणीनुसार १८ हजार ते ६३ हजार २०० रुपयांपर्यंत मासिक पगार मिळेल.
उमेदवारांनी रिक्त पदांशी संबंधित कौशल्य आत्मसात केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त केले असणे आवश्यक आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये तसेच अधिकृत वेबसाईटवर भारतीय लष्कराच्या मुख्यालय २२ अंतर्गत ग्रुप सी पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जाहिरातीत नमूद कट-ऑफ तारखेनुसार उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांची निवड ही निवड लेखी चाचणी, प्रात्यक्षिक आणि व्यापार चाचणीच्या आधारे केली जाणार आहे.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
सरकारी नियमानुसार आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सवलत आहे. याची माहिती अधिसूचनेत आहे. उमेदवारांना अधिसूचनेत नमूद अटी आणि शर्ती तसेच नियमांचे पालन करावे लागेल.
अर्ज करण्याआधी अधिसूचना व्यवस्थित वाचणे उमेदवारांच्या हिताचे आहे. अर्जात त्रुटी असतील अथवा अधिसूचनेत नमूद मुदतीनंतर अर्ज आला तर तो अर्ज बाद ठरवला जाईल. बाद अर्जांचा विचार होणार नाही.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. उमेदवारांनी पूर्ण भरलेला फॉर्म आणि सोबत जोडलेली आवश्यक कागदपत्रे जाहिरात प्रकाशित झाल्यापासून २१ दिवसांच्या आत - ग्रुप कमांडर, मुख्यालय २२, मूव्हमेंट कंट्रोल ग्रुप, पिन-९००३२८, सी/ओ ९९ एपीओ येथे सबमिट करणे आवश्यक आहे. उमेदवारांना अर्जाच्या लिफाफ्यावर अर्ज केलेल्या पदाचे नाव लिहावे लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2023 ही आहे.