भारतीय नौदलात नोकरीची संधी, २७०० पदांसाठी भरती, शिक्षण १२वी पास

Indian Navy Recruitment: भारतीय नौदलात २७०० पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खाली स्क्रोल करा.

indian navy recruitment 2700 sailor aa ssr posts apply online joinindiannavy.gov.in job news marathi
भारतीय नौदलात नोकरीची संधी, २७०० पदांसाठी भरती (फोटो सौजन्य: www.joinindiannavy.gov.in) 

थोडं पण कामाचं

  • तरुणांना नोकरीची संधी
  • भारतीय नौदलात २७०० पदांसाठी भरती
  • भरती प्रक्रियेसाठी शिक्षण १२वी पास 
  • इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ 

मुंबई: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय नौदलात २७०० पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार आपला उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ आहे. जाणून घेऊयात या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील सविस्तर माहिती...

पदाचे नाव

सेलर (AA आणि SSR) 

पदांची संख्या

- ऑर्टिफिशिअल अॅप्रेंटिस (AA) - ५०० पदं 
- वरिष्ठ माध्यमिक भरती विभाग (SSR) - २२०० पदं 

शैक्षणिक अर्हता

आर्टिफिशिअल अॅप्रेंटिस पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार हा १२वी पास असावा.  गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह ६० टक्के मार्क्स आवश्यक आहे. 
वरिष्ठ माध्यमिक भरती विभागातील पदासाठी इच्छूक उमेदवार हा १२वी पास असावा. 

वयोमर्यादा

उमेदवाराचा जन्म १ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २०००३ या तारखेच्या दरम्यानचा असावा. वयोमर्यादेच्या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी नोकरीची अधिकृत नोटिफिकेशन पहावं.

महत्वाच्या तारखा

अर्ज भरण्यास सुरुवात - ४ नोव्हेंबर २०१९ 
अर्ज भरण्याची शेवटची तारीख - १८ नोव्हेंबर २०१९ 

पगार

पात्र उमेदवारांना २१,७०० रुपये ते ६९,१०० रुपयां दरम्यान पगार मिळेल. सविसत्र माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.

परीक्षा फी

सर्वसाधारण आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २१५ रुपये परीक्षा फी
एसटी/एसटी प्रवर्गातील उमेदवार / महिला उमेदवारांना परीक्षा फी द्यावी लागणार नाहीये

अर्ज करण्याची प्रक्रिया

इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज सादर करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी https://www.joinindiannavy.gov.in/en/account/login येथे क्लिक करा.

या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील सविस्तर माहिती पाहण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://www.joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी आणि मगच आपला अर्ज सादर करावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...