मुंबईत Indian Navy देणार 338 जणांना जॉबची मोठी संधी; ऑनलाईन लगेच करा अर्ज

नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत भारतीय नौदलाने (Indian Navy Mumbai Dockyard) अप्रेंटिस (Indian Navy Recruitment 2022) पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी (Indian Navy Jobs) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट indiannavy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

 The Indian Navy will provide job opportunities to 338 people in Mumbai
मुंबईत Indian Navy देणार 338 जणांना जॉबची मोठी संधी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2022 असणार आहे.
  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवाराचं वय हे 01 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 च्या दरम्यान असणं आवश्यक

मुंबई : नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत भारतीय नौदलाने (Indian Navy Mumbai Dockyard) अप्रेंटिस (Indian Navy Recruitment 2022) पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी (Indian Navy Jobs) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट indiannavy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

विविध विभागांमध्ये अप्रेन्टिस (Apprentice in Different Departments) -  एकूण जागा 338

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

विविध विभागांमध्ये अप्रेन्टिस (Apprentice in Different Departments) - 

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. दहावीत उमेदवारांना 50% टक्के गुण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. यात त्यांना 65% गुण असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 01 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आहेत आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 8 जुलै 2022

अधिकची माहिती हवी असल्यास येथे क्लिक करा.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी