Sarkari Naukari Indian Railway Recruitment 2023: भारतीय रेल्वेत नोकरीची करण्याचं स्वप्न असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय रेल्वेने देशभरात 10वी पास उमेदवारांसाठी जवळपास 2422 जागांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) ने मध्य रेल्वेच्या अंतर्गत अॅप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आपला अर्ज दाखल करु शकतात.
भारतीय रेल्वेच्या rrccr.com या अधिकृत वेबसाईटवरुन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज दाखल करु शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2023 आहे. तसेच https://rrccr.com/Home/Home या लिंकवर क्लिक करुन तुम्ही आपला उमेदवारी अर्ज दाखल करु शकता. या भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी https://rrccr.com/rrwc/Files/196.pdf या लिंकवर क्लिक करुन (Indian Railway Recruitment 2023 PDF file) पीडीएफ फाईल डाऊनलोड करु शकता.
हे पण वाचा : या महिन्यात तुमचा पगार वाढणार, सरकार लवकरच घोषणा करणार
उमेदवार हा मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून कमीतकमी 50 टक्क्यांसह 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा : आचार्य चाणक्य सांगतात, या 4 गोष्टींमुळे लक्ष्मी माता जाते दूर
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागणार आहेत.
हे पण वाचा : तुमचं बाळ कमी बोलतंय? जाणून घ्या कारण....
Indian Railway Recruitment 2023 या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदावाराचे वय 15 डिसेंबर 2022 पर्यंत 15 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तर अधिकाधिक वय 24 वर्षांहून कमी असावे.