iocl recruitment 2022 registrations for technician non technician apply on iocl.com : सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात आयओसीएल या सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी आहे. आयओसीएलमध्ये टेक्निशिअन, ग्रॅज्युएट, टेक्नीकल आणि नॉन टेक्नीकल अशा वेगवेगळ्या विभागांतील 1760 पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी https://iocl.com/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. नोकरीच्या संधीबाबतची माहिती अधिकृत वेबसाईटवर https://iocl.com/latest-job-opening या लिंकवर मिळेल.
आयओसीएलमध्ये 1760 पदांसाठी मंगळवार 3 जानेवारी 2022 पासून ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी आधी आयओसीएलच्या अधिकृत वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
आयओसीएलसाठी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामीळनाडू, पुदुच्चेरी, केरळ, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आसाम, सिक्कीम, दिल्ली, हरयाणा, पंजाब, चंदिगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड या राज्यांमध्ये नोकरीच्या निमित्ताने नियुक्ती होऊ शकते.
Heart Attack: हिवाळ्यात सर्वाधिक असतो हार्ट अॅटकचा धोका, अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी