बापरे ! चांगली नोकरी मिळण्यासाठी लागेल एक वर्ष; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या १ कोटी नोकऱ्या

देशात गेल्या एक वर्षापासून कोरोनाचं संकट (corona crisis) घोंघावत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट (The second wave of corona) असून या लाटेत आर्थिक चक्रावर याचा मोठा परिणाम झालेला आहे.

one crore jobs gone in The second wave of corona
बापरे ! चांगली नोकरी मिळण्यासाठी लागेल एक वर्ष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ९७ टक्के भारतीयांची कमाई घटली.
  • देशातील बेरोजगारी दर १२ टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो.
  • संघटित क्षेत्रातील रोजगारांची संधी निर्माण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागेल.

नवी दिल्ली :  देशात गेल्या एक वर्षापासून कोरोनाचं संकट (corona crisis) घोंघावत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट (The second wave of corona) असून या लाटेत आर्थिक चक्रावर याचा मोठा परिणाम झालेला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ९७ टक्के भारतीयांची कमाई घटली आहे. दरम्यान कोरोनाच्या या संकटात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.

खासगी थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (Think Tank Center for Monitoring Indian Economy)(CMIE) चे सीईओ महेश व्यास यांनी एका माध्यमाला सांगितले की, देशातील बेरोजगारी दर (Unemployment rate) १२ टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो, एप्रिल महिन्यात बेरोजगारीचा दर हा ८ टक्के होता. मागील वर्षी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे मे महिन्यात बेरोजगारीचा दर २३.५ टक्क्यापर्यंत पोहचला होता. दरम्यान काही जाणकारांच्या मते संसर्गाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे, यामुळे लावण्यात आलेले राज्यांमधील निर्बंध हळू - हळू कमी केली पाहिजेत. जेणेकरून अर्थचक्राला गती मिळेल.   

रोजगारावरील कोरोनाचे साइड इफेक्ट्स

 

ज्या लोकांची नोकरी गेली आहे, त्यांना परत चांगल्या पगाराची नोकरी मिळणे जरा अवघड आहे. असंघटित क्षेत्रातील नोकऱ्या लवकर मिळू लागतील. पण चांगल्या प्रकारचा जॉब आणि संघटित क्षेत्रातील रोजगारांची संधी निर्माण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागेल. दरम्यान आता काही बाजार पेठ सुरू होत आहेत. त्यामुळे अर्थचक्र फिरू लागले आहे आणि  बेरोजगारीची समस्या काही प्रमाणात सुटेल. पूर्णपणे ही समस्या मिटणार नाही. यावेळी बाजारातील मजुरांचा सहभाग कमी होत ४० ट्क्क्यांवर आला आहे. दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेसाठी साधरण ३-४ टक्के बेरोजगारी दर सामान्य असतो. 

व्यास म्हणाले की, मागील वर्षी आमच्या संस्थेमार्फत १.७५ लाख कुटुबांचा एक देशव्यापी सर्व्हे करण्यात आला होता. यानुसार, मागील वर्षी कमाईचा चिंता वाढणारा आकडा समोर आला होता. सर्व्हेमध्ये फक्त तीन टक्के कुटुबांनी आपलं उत्पन्न वाढल्याचं सांगितलं होतं. जर ५५ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांचे उत्पन्नात घसरण झाली आहे. तर बाकी ४२ टक्के लोकांच्या उत्पन्नात कोणताच बदल झालेला नव्हता. या हिशोबाने पाहिले तर ९७ टक्के कुटुंबांचे उत्पन्नात घसरण झाली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी